Latest

सांगली : माव्यासाठी मित्राच्या डोक्यात बाटली घातली

backup backup

सांगली : पुढारी वृत्तसेवा बुधगाव येथे मावा दिला नाही म्हणून मित्रास मारहाण करून खिशातील 650 रूपये काढून घेतले. तसेच डोक्यात दारूची बाटली मारून जखमी केले. याप्रकरणी जखमी मयूर अमर हिमागर (वय 34, लक्ष्मीनगर, साखर कारखानासमोर) याने लाड्या उर्फ योगेश सुभाष रेळेकर (वय 29, वनवासवाडी, बुधगाव) याच्याविरूद्ध फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी सांगितले, मयूर आणि त्याचा मित्र लाड्या हे दोघेजण बसस्थानकाजवळ इम्तियाज याच्या पानपट्टीजवळ थांबले होते. तेव्हा लाड्याने मयूरला मावा दे नाहीतर, असे म्हणून शिवीगाळ केली. मयूरने पैसे नसल्याचे सांगताच लाड्याने त्याला राजवाडा चौकात पैसे आणण्यासाठी नेले. तेथे कमानीजवळ लाड्याने मयूरला कानफटीत मारून शर्टाच्या खिशातील 650 रूपये काढून घेतले. तसेच मोबाईल दगडावर आपटून फोडला. मयूर त्याला विरोध करत असताना लाड्याने दारूची बाटली डोळ्याच्या बाजूला मारून जखमी केले.

हेही वाचलतं का?

SCROLL FOR NEXT