Latest

सांगली : फुटीर नगरसेवकांची घरवापसी; महिला व बालकल्याण सभापतीपदी भाजपच्या अस्मिता सलगर

स्वालिया न. शिकलगार

सांगली : पुढारी वृत्तसेवा : महापालिकेच्या महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी भाजपच्या अस्मिता सलगर विजयी झाल्या. त्यांना ९ मते मिळाली. काँग्रेसच्या उमेदवार आरती वळवडे यांना ७ मते मिळाली. भाजप फुटीर नगरसेविका नसिमा नाईक यांचे मत भाजपला मिळाले. त्यामुळे भाजपच्या सलगर विजयी झाल्या. नाईक यांच्या घरवापसीमुळे भाजप विजयाचा मार्ग सुकर झाला.

समाजकल्याण सभापतीपदी भाजपच्या अनिता वनखंडे बिनविरोध

महापालिकेच्या समाजकल्याण समिती सभापतीपदी भाजपच्या अनिता वनखंडे बिनविरोध निवडून आल्या. काँग्रेसच्या उमेदवार कांचन कांबळे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला.

SCROLL FOR NEXT