Latest

Old Virus Active सर्वात जुन्या विषाणूंना संशोधकांनी केले ‘जिवंत’; मानवजातीला धोका

Arun Patil

मॉस्को : (Old Virus Active)आंतरराष्ट्रीय वैज्ञानिकांच्या एका पथकाने जगातील सर्वात प्राचीन विषाणूंना पुन्हा एकदा सक्रिय केले आहे. हे विषाणू कोट्यवधी वर्षांपासून रशियाच्या बर्फाळ अशा सैबेरियात दबलेले होते. सैबेरियातील वितळत असलेला बर्फ हा मानवजातीसाठी धोकादायक ठरू शकतो, असा इशाराही वैज्ञानिकांनी दिला आहे. या बर्फात कोट्यवधी वर्षांपासून दबलेले असे अनेक विषाणू आजही सजीवांमध्ये संक्रमण करण्याची क्षमता बाळगून आहेत. अशा धोकादायक विषाणूंपासून मानवजातीने सावध राहण्याची गरज असल्याचे वैज्ञानिकांनी म्हटले आहे.

वैज्ञानिकांनी सक्रिय केलेल्या विषाणूने (Old Virus Active) प्रयोगशाळेत एका अमिबाला संक्रमितही केले आहे हे विशेष. वैज्ञानिकांनी म्हटले आहे की या विषाणूंपैकी एक विषाणू तर सुमारे 50 हजार वर्षांपूर्वीचा आहे. वैज्ञानिकांच्या पथकातील एक सदस्य जीन मायकल क्लावेरी यांनी सांगितले की हा विषाणू 48,500 वर्षांपूर्वीचा आहे.

इतक्या प्राचीन काळातील हा विषाणू अनुकूल वातावरण मिळताच पुन्हा सक्रिय होऊन एखाद्या सजीवाला संक्रमितही करू शकतो हे लक्षणीय आहे. या संशोधनात एकूण 7 प्राचीन विषाणूंचे अध्ययन करण्यात आले. वैज्ञानिकांच्या या समूहात रशिया, फ्रान्स आणि जर्मनीचे वैज्ञानिक आहेत. यापूर्वी वैज्ञानिकांनी 30 हजार वर्षांपूर्वीच्या दोन विषाणूंना (Old Virus Active) 'जिवंत' केले होते. अन्य काही संशोधकांनी यापूर्वी असा दावा केला होता की त्यांनी एका अशा बॅक्टेरिया म्हणजेच जीवाणूला सक्रिय केले आहे जो तब्बल 25 कोटी वर्षांपूर्वीचा आहे.

वैज्ञानिकांनी आता ज्या विषाणूंना सक्रिय (Old Virus Active) केले आहे ते सर्व पंडोराव्हायरस श्रेणीतील आहेत. या श्रेणीमधील विषाणू अमिबासारख्या एकपेशीय जीवांना संक्रमित करण्याची क्षमता बाळगून असतात. जुन्या काळातील असे नऊ विषाणू हजारो वर्षे बर्फाखाली दबलेले राहूनही जिवंत पेशींना संक्रमित करू शकतात असे दिसले आहे. असे विषाणू बर्फातून मुक्त झाल्यावर वनस्पती, पशू व मानवांनाही संक्रमित करू शकतात असा धोक्याचा इशारा संशोधकांनी दिला आहे.

हेही वाचा :  

SCROLL FOR NEXT