US support protest in china : चीनमधील ‘झिरो कोविड’विरोधी आंदोलनास अमेरिकेचे समर्थन

US support protest in china : चीनमधील ‘झिरो कोविड’विरोधी आंदोलनास अमेरिकेचे समर्थन
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : चीनमध्‍ये कोरोना प्रतिबंधासाठी लादण्‍यात आलेल्‍या लॉकडाउनविरोधात जनता रस्‍त्‍यावर उतरली आहे. आता या आंदोलनाचे अमेरिकेने समर्थन केले आहे. ( US support protest in china )

चीनमध्‍ये वाढत्‍या कोरोना रुग्‍णसंख्‍येमुळे झिरो कोविड पॉलिसी राबवली जात आहे. कोरोना प्रतिबंधासाठी नागरिकांवर कडक निर्बंध लादले गेले असून, याविरोधात मागील चार दिवस जनता रस्‍त्‍यावर उतरली आहे. राजधानी बीजिंगमध्‍ये सुरु झालेले आंदोलनाचा वणवा आता १३ शहरांपर्यंत पोहचला आहे.

आम्‍ही शांततापूर्ण आंदोलनाचे समर्थन करतो

चीनमधील लॉकडाउनविरोधी आंदोलनाचे अमेरिकेने समर्थन केले आहे. चीनमध्‍ये राबविण्‍यात येत असलेल्‍या झिरो कोविड पॉलिसीचा काहीच उपयोग होणार नाही. आम्‍हाला वाटते की, चीनमध्‍ये झिरो कोविड पॉलिसीच्‍या माध्‍यमातून कोरोना विषाणूला रोखणे अत्‍यंत कठीण आहे. आम्‍ही जगभरात कोठेही शांततापूर्ण मार्गाने सुरु  असणार्‍या आंदोलनाचो समर्थन करतो, असे व्‍हाईट हाऊसचे राष्‍ट्रीय सुरक्षा परिषदेचे संवाद समन्वयक जॉन किर्बी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

US support protest in china :  चीनमधील घटनांवर अमेरिकेची नजर

जॉन किर्बी म्‍हणाले, चीनमधील घडामोडींवर अमेरिका लक्ष ठेवून आहे. आम्ही जगभरात कोविड लसींचा सर्वात मोठे पुरवठादार आहोत. लस मिळवण्यासाठी चीनकडून मागणी झालेली नाही. जगभरातील शांततापूर्ण आंदोलनास आमचा पाठिंबा आहे. लोकांना एकत्र येऊन शांततापूर्ण मार्गाने आपले मत मांडण्‍याचा अधिकार आहे. त्‍यांना कायद्यांविरुद्ध निषेध  करण्याचा अधिकार दिला पाहिजे, अशी अपेक्षाही किर्बी यांनी व्‍यक्‍त केली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news