Latest

सराईत गुन्हेगारावर एमपीडीए अंतर्गत बारामती पोलिसांची कारवाई

अमृता चौगुले

बारामती : पुढारी वृत्तसेवा

बारामती तालुका पोलिसांनी मेडद (ता. बारामती) येथील सूरज उर्फ माऊली सोमनाथ काशीद या सराईतावर एमपीडीए अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव पाठवला होता. जिल्हाधिकाऱ्यांनी त्याला मंजुरी दिल्याने काशीद याला पोलिसांनी एक वर्षासाठी स्थानबद्ध केले. काशिद याच्यावर तालुका, शहर व वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात एकूण १३ गुन्हे दाखल आहेत.

त्यामध्ये जीवघेण्या हल्ल्यासह अन्य गुन्ह्यांचा समावेश आहे. अनेक गुन्हे दाखल होवूनही त्याची गुन्हेगारी कृत्ये थांबत नव्हती. त्यामुळे त्याच्या मुसक्या आवळण्यासाठी उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे, पोलिस निरीक्षक महेश ढवाण यांनी त्याच्या विरोधात एमपीडीए अंर्तगत प्रस्ताव तयार केला. जिल्हा पोलिस अधिक्षक डाॅ. अभिनव देशमुख यांच्यामार्फत तो जिल्हाधिकारी कार्यालयाला पाठविण्यात आला होता. त्याला नुकतीच मान्यता मिळाली.

त्यानंतर काशीद याला पोलिसांनी एक वर्षासाठी येरवडा कारागृहात स्थानबद्ध केले. तालुका पोलिस ठाण्याकडून आणखी सहा जणांविरोधात एमपीडीए अंतर्गत कारवाईचे प्रस्ताव देण्यात आले आहेत. उपविभागातून १५ प्रस्ताव पाठविण्यात आले असल्याचे इंगळे व ढवाण यांनी सांगितले. ढवाण यांच्यासह हवालदार राम कानगुडे, सुरेश दडस, बापू बनकर, अमोल नरुटे, रणजित मुळीक, प्रशांत राऊत, नितीन कांबळे यांनी या प्रस्तावासाठी परिश्रम घेतले.

अन्यथा कारवाई अटळ

गुन्हेगारांनी गुन्हेगारी थांबवावी, ती न थांबवल्यात त्यांच्याविरोधात तात्काळ एमपीडीए अंतर्गत कारवाई प्रस्तावित केली जाईल. त्यानंतर वर्षभर अशा लोकांना कारागृहात स्थानबद्ध व्हावे लागेल. त्यामुळे अशा लोकांनी वेळीच सावध होत गुन्हेगारीपासून परावृत्त व्हावे असे आवाहन उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे व पोलिस निरीक्षक महेश ढवाण यांनी केले.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT