Latest

गडहिंग्लज : शिवरायांचा सच्चा मावळा! सदर्‍याला आग; मात्र झेंडा खाली ठेवला नाही

Shambhuraj Pachindre

गडहिंग्लज : पुढारी वृत्तसेवा

अनेक शिवभक्तांच्या भक्तीची चर्चा अनेक ठिकाणी ऐकावयास मिळते; मात्र महाराजांबद्दल असलेला आदर गडहिंग्लजमधील एका लहानग्याने दाखवून दिला. शिवज्योत आणताना सदर्‍याला आग लागलेली असताना हातातील झेंडा खाली ठेवायचा नाही, या भावनेतून त्याने आगीच्या झळा सोसल्या; मात्र भगवा झेंडा खाली ठेवला नाही. गडहिंग्लजमधील शेंद्री रोडवरील सोहम सूरज गवळी या अकरा वर्षांच्या लहानग्या शिवभक्ताला आगीचे चटके पोटावर बसूनही झेंडा खाली ठेवला नाही.

सोहम हा शेंद्री रोडवरील केबीआर  ग्रुपची शिवज्योत आणण्यासाठी सामानगडावर गेला होता. शिवज्योत घेऊन केबीआरचे शिवभक्त शेंद्री रोडवर आले होते. सोहम शिवज्योतीजवळच उभा होता. ज्योतीमधील एक ठिणगी शिवमच्या सदर्‍यावर पडली. याची जाणीव सोहमला झाली; पण हातामध्ये भगवा झेंडा असल्याने झेंडा खाली ठेवलाच नाही. सोहमला दवाखान्यामध्ये दाखल करण्यात आले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT