Latest

व्हिडिओ न्यूड शूट करून मला गुप्तांग दाखवलं जाणार नाही असं सांगितलं, पण..

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : न्यूड शूट : शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राच्या पोर्न रॅकेटमधील दिवसागणिक अनेक सुरस कथा बाहेर येत आहेत. या प्रकरणात अनेक मुली आपली बाजू मांडण्यासाठी समोर आल्या नसल्या, तरी काहींनी झालेला घटनाक्रम धाडसाने समोर येऊन सांगितला आहे.

राज कुंद्राने पोर्न रॅकेटसाठी अनेक मराठी अभिनेत्रींकडेही व्हिडिओची मागणी केल्याचे समोर आले आहे. मनीषा केळकरने याबाबतीत खुलासा केला होता. तिने या प्रकरणात गौडबंगाल वाटल्याने आपण त्यांना प्रतिसाद दिला नसल्याचे सांगितले.

आणखी एक धक्कादायक माहिती समोर

हे प्रकरण ताजे असतानाच आता आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. एका पीडित मुलीने न्यूड शूट व्हिडिओ कैफियत सांगताना मुंबईमधील माळवाडी तक्रार दाखल केली आहे. पीडित मुलीने गुन्हा दाखल करताना अनेक सनसनाटी खुलासे केले आहेत.

पीडिताने आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, व्हिडिओ शूट होत असताना गुप्तांग दाखवले जाणार नाही असे खात्रीपूर्वक सांगण्यात आले होते. तथापि, फसवून व्हिडिओ शूट करून ते ॲपवर टेलिकास्ट करण्यात आल्याचे तिने म्हटले आहे.

वृत्तानुसार गुन्हे शाखेकडून या प्रकरणी पीडित मुलीचा जबाव नोंदवला आहे. इंटिमेट सीन चित्रित करताना गुप्तांग दाखवले जाणार नाही असे सांगितले, पण त्यानंतर फसगत झाल्याचे तिने म्हटले आहे.

व्हिडिओ शूट करण्यासाठी पीडित मुलींना काही हजार रुपये देऊन तयार करण्यात आले होते. त्यासाठी एक करारही त्यांच्यासोबत करण्यात आला.

दरम्यान, पीडित मुलीच्या मित्राने मैत्रिणीचा पोर्न व्हिडिओ ॲपवर असल्याचे सांगितले.

हा व्हिडिओ पाहिल्यानंतर व्हिडिओ अनकट पद्धतीने अपलोड केल्याचे लक्षात आल्याचे त्याने म्हटले आहे.

हे ही वाचलं का?

https://youtu.be/KbUVeiVBAdY

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT