Latest

वैद्यनाथ बँक : उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन चितळे अटकेत

backup backup

परळी वैजनाथ; पुढारी वृत्तसेवा : वैद्यनाथ बँक : येथील वैद्यनाथ नागरी सहकारी बँकेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन चितळे यास उस्मानाबाद येथील आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी अटक केली आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यातील हावरगाव येथील शंभु महादेव सहकारी साखर कारखान्याच्या साखर घोटाळा प्रकरणी ही कारवाई झाली आहे. वैद्यनाथ बँकेडे तारण म्हणून ठेवलेल्या 46 कोटी रूपयांच्या साखरेत हा घोटाळा झाला होता.

या प्रकरणी कारखान्याचे चेअरमन दिलीप आपेट याच्यासह चाळीस जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झालेला आहे. याच प्रकरणी तपास करणार्‍या उस्मानाबाद येथील आर्थिक गुन्हा शाखेच्या अधिकार्‍यांनी परळी येथील वैद्यनाथ बँकेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन चितळे यास अटक केली आहे. या कारवाईची येथे चर्चा होत आहे.

हे ही वाचलं का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT