Latest

लीसा हेडन हिचा बाळाला ब्रेस्टफिडिंग करतानाचा फोटो व्हायरल, नेटकरी म्हणाले…

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन : लीसा हेडन हिचा बाळाला ब्रेस्टफिडिंग करतानाचा पुन्हा एकदा फोटो व्हायरल झाला आहे. याशिवाय लीसा हेडन हिने आपल्या बाळाच्या नावाचा खुलासा केला आहे. तसेच पतीची ओळखदेखील सांगितली आहे. यावर नेटकऱ्यांनी तिला काय कमेंट्स दिले आहेत पाहा.

लिसा हेडन

अधिक वाचा – 

लीसा एक मॉडल आणि अभिनेत्री आहे. लिसा टीव्ही शो इंडिया टॉप मॉडेलमध्ये जज म्हणून दिसली होती. तिने २०१६ मध्ये डिनो लालवानीशी लग्न केलं होतं.

अधिक वाचा – 

लीसा मागील काही महिन्यांपासून तिच्या प्रेग्नेन्सीवरून चर्चेत होती. जेव्हा ती प्रेग्‍नेंट होती, तेव्हा बेबी बंपचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करायची. त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत होते.

अधिक वाचा – 

आता प्रसुतीनंतर तिने तिच्या सुंदर परीचा पहिला फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

विशेष म्हणजे, लीसाने तिच्या बाळाला ब्रेस्टफिडिंग करतानाचे फोटोज आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.

लिसा हेडन

बाळाचे नाव लारा ठेवले

लीसाने बाळाचे नाव लारा ठेवलं आहे. एका फोटोमध्ये ती व्हाईट कलरच्या मिनी वनपीसमध्ये दिसत आहे.

दुसऱ्या एका फोटोमध्ये तिने ब्लॅक ओव्हरकोट घातलेला दिसतो. तर बाळाला व्हाईट कलरचा बेबी ड्रेस घातलेला दिसतो.

लिसाला याआधी दोन मुले आहेत. लारा ही तिची तिसरी मुलगी आहे.

लिसाने अनेक जाहिरातींमध्ये काम केलं आहे. तिने आपल्या बॉलीवूड करिअरची सुरुवात चित्रपट आयेशामधून केली होती.

यामध्ये ती सोनम कपूरसोबत दिसली होती. लिसाला मोठा ब्रेक मिळाला तो क्वीन चित्रपटात.

तिच्या करिअरला मोठे वळण या चित्रपटातून मिळाले.

क्वीनमध्ये लिसाने कंगनासोबत सहाय्यक भूमिका साकारली होती. तिच्या या चित्रपटातील अभिनयाचे कौतुकदेखील झाले होते.

हेदेखील वाचलंत का-

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT