पुढारी ऑनलाईन डेस्क : "जो चमत्कार झालाय तो मान्य केला पाहिजे, राजकारणात रिस्क घ्यावीच लागते, ही रिस्क मुख्यमंत्री ठाकरेंनी घेतली व सहावी सीट लढवली" अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यसभेच्या निकालानंतर दिली. तसेच विरोधकांकडून हरकत घेणं हा रडीचा डाव असल्याची टीकाही त्यांनी भाजपवर केली.
यावेळी पवार म्हणाले की, राज्यसभेच्या निकालाने सरकारला कोणताही धोका नसून हा निकाल धक्का बसण्यासारखा नाही. ही निवडणूक सोपी नव्हती, सहाव्या जागेसाठी लागणारी मतांची संख्या आमच्याकडे कमी होती. तरीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रिस्क घेतली. राजकारणात रिस्क घ्यावीच लागते असे त्यांनी सांगितले. तसेच फडणवीसांना आमच्याकडे असलेले अपक्ष आमदार वेगवेगळ्या मार्गाने वळवण्यात यश आले असून जो चमत्कार झालाय तो मान्य केला पाहिजे, असेही ते म्हणाले.
हेही वाचलंत का ?