Latest

Maharashtra Budget 2023-2024 Live: मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक-लाडकी’ योजनेची घोषणा, मुलीच्या जन्मानंतर ५००० रुपये मिळणार

मोनिका क्षीरसागर
पुढारी ऑनलाईन : राष्ट्राची प्रगती ही महिला सक्षमीकरणाच्या आधारे ठरवली जाते. त्यासाठी आम्ही चौथे सर्वसमावेशक महिला धोरण राबवणार असून यासाठी अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'लेक-लाडकी' योजनेची घोषणा अर्थसंकल्पातून केली केली. या योजनेंर्गत  पिवळ्या व केशरी रेशन कार्ड कुटुंबातील मुलीच्या जन्मानंतर ५००० रुपये, इयत्ता चौथी ४००० रुपये, सहावीत गेल्यावर सहा हजार रुपये आणि अकरावीत आठ हजार रुपये अनुदान दिले जाईल. लाभार्थी मुलीचे वय १८ जागा पूर्ण झाल्यानंतर तिला ७५ हजार रुपये दिले जातील.
SCROLL FOR NEXT