Latest

मुंबै बँक मजूर प्रकरणी प्रवीण दरेकर यांना दुसऱ्यांदा नोटीस

अनुराधा कोरवी

मुंबई; पुढारी ऑनलाईन : मुंबई पोलिसांनी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना ११ एप्रिलला चौकशीसाठी हजर राहण्यासाठी नोटीस पाठवली आहे. दरेकर यांच्याविरुद्ध एमआरए मार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबै बँक मजूर प्रकरणात मुंबई पोलिसांनी दरेकर यांना दुसऱ्यादा नोटीस बजावली आहे.

प्रवीण दरेकर हे गेल्या सोमवारी (दि. ३) रोजी मुंबईतील माता रमाबाई आंबेडकर पोलिस ठाण्यात चौकशीसाठी हजर राहिले होते. या चौकशी दरम्यान त्याच्यावर दबाव असल्याने त्याच्याकडून ठोस माहिती मिळाली नव्हती. यामुळे पोलिसांनी त्यांना दुसऱ्यांदा चौकशीसाठी बोलावले असल्याचे सांगितले आहे.

आम आदमी पार्टीच्या वतीने प्रवीण दरेकर यांच्याविरोधात तक्रार नोंदवण्यात आली होती. मजूर नसतानाही याच प्रवर्गातून मुंबै बँकेच्या संचालकपदाची निवडणूक लढवून सरकारची फसवणूक केल्‍याचा आरोप त्‍यांच्यावर करण्यात आला. त्‍यानंतर दरेकर यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला होता. यानंतर मुबई पोलिसांनी त्याच्या चौकशीला सुरूवात केली आहे.

हेही वाचलंत का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT