Latest

मुंबईला पाणीपुरवठा करणारे तलाव ९८ टक्‍क्‍यांवर; भातसा तलावही भरला

निलेश पोतदार

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : मुंबईला पाणीपुरवठा करणारे तलाव भरत आले आहेत. या तलावांमध्ये 98 टक्के पाणीसाठा झाला आहे. शहराला दररोज सर्वाधिक 1850 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करणारा भातसा तलावही भरत आला आहे. नाशिक जिल्ह्यातील अप्पर वैतरणा तलावातील पाणीसाठाही 93 टक्‍क्‍यांवर पोहोचला आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणारे तलाव भरल्‍याने या वर्षीचा मुंबईकरांचा पाण्याचा प्रश्न मिटला आहे.

मुंबई शहराला पाणीपुरवठा करणारे तुळशी, विहार, मोडकसागर व तानसा हे चार तलाव ऑगस्टमध्येच ओसंडून वाहू लागले. शहराला सर्वाधिक पाणीपुरवठा करणाऱ्या भातसा तलावातील पाणी साठा 98.58 टक्‍क्‍यांवर पोहोचला आहे. या तलावात 7 लाख 17 हजार दशलक्ष लिटर पाणी साठवण्याची क्षमता आहे.

सध्या या तलावांमध्ये 7 लाख 6 हजार 886 दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा आहे. हा तलाव कधीही ओसंडून वाहू लागेल. राज्य सरकारच्या अखत्यारीत असलेला भातसा तलाव भरल्यामुळे मुंबईवरील पाणी टंचाईचे संकट आता कायमस्वरूपी दूर झाले आहे.

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांमध्ये 14 लाख 47 हजार 363 दशलक्ष लिटर पाणी साठवण्याची क्षमता आहे. 13 सप्टेंबर पहाटे 6 वाजेपर्यंत सातही तलावातील पाणीसाठा 14 लाख 14 हजार 350 वर पोहोचला आहे.

हेही वाचलं का  ?

[visual_portfolio id="37019"]

पहा व्हिडिओ :  कलाकारांच्या घरचा गणपती : चला जाऊया स्वप्निल जोशीच्या घरी बाप्पाच्या दर्शनाला

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT