Latest

ब्रा आणि बुब्ज वर मी बोलले कारण…” | हेमांगी कवी Exclusive

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन; आर्या इल्हे : ब्रालेस इज ब्रेव्ह ! पाश्चिमात्य देशात ही संकल्पना फार जुनी आहे. त्यामुळे तिथे पुरुषांचा महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन ही समानतेचा आहे. प्रियांका चोप्रापासून दीपिका पदुकोण अशा अभिनेत्री ज्यांनी हॉलीवूड सिनेमात कामं केली आहेत. त्यांनी तिथे ब्रालेस कपडे घालून स्वतःला अगदी ग्रेसफुली मिरवलं आहे. एवढेच काय तर टीव्ही अभिनेत्री निया शर्मा ही अनेकवेळा ब्रालेस आणि बॅकलेस कपडे घालून स्वतःला प्रेजेंट करते. हा बदल आपण हिंदी सिनेमात एक्सेप्ट केला आहे. पण असचं जर एखादी मराठी अभिनेत्री करू लागली तर ती ट्रोल होते. हा दुटप्पीपणा का? याच विषयाला वाचा फोडण्याचे काम अभिनेत्री हेमांगी कवीने केले आहे.

अधिक वाचा – 

हेमांगीचा सोशल मीडियावर चपात्या करतानाचा व्हिडियो व्‍हायरल झाला आणि मग तुला काम मिळत नाही म्हणून तू तुझे बुब्स हलवत आम्हाला दाखवणार आहे का?तुझे निप्पल्स दिसत आहेत तुला अक्कल नाही का? अशावर परखडपणे उत्तर देणारी हेमांगी कवी म्हणते,

" माझ्या घरात मी पाहिजे तशी राहीन " !

त्यावर नुकतंच सडेतोड उत्तर हेमांगी कवीने तिच्या सोशल मीडियावर एक पोस्टच्या माध्यमातून दिलं आहे. "बाई, बुब्स आणि ब्रा" या विषयावर महिलांचा जवळचा प्रश्न तिने मांडला तो ही दिलखुलासपणे.

यावर संतप्त प्रतिक्रिया आल्या खऱ्या मात्र या विषयाचे स्वागत ही जोरदार झाले आहे.

हेमांगीने 'पुढारी ऑनलाईन'शी याविषयी मनमोकळी बातचीत केली आहे ..

याआधीदेखील हेमांगीने बऱ्याच सामाजिक आणि बोल्ड विषयावर आपली ठाम मतं मांडली आहेत.

'मुलींनी दारु पिणे, सिगारेट ओढणे, किती पुरुषांबरोबर संबंध ठेवणे या सर्व वैयक्तिक गोष्टी आपल्या समाजाने 'बोल्डच्या ब्राकेट' मध्ये बसवले आहे. बोल्ड कशाला म्हणतात जे समाजमान्य नाही जे कोणीही सहज करत नाही आणि मग एखाद्याने ती गोष्ट केली तर त्याला आपला समाज बोल्ड असं नाव देतो.

अधिक वाचा – 

याला तुम्ही बिनधास्त म्हणा किंवा बोल्ड म्हणा, माझ्या लेखी हा व्यक्ती स्वातंत्र्याचा भाग आहे. जो आज प्रत्येकाचा हक्क आहे.
आम्ही तिला विचारले की,  मुली नेहमीच शब्द ही सांभाळून वापरतात स्वत: ला नेहमी सावरतच राहतात आणि यातच त्यांचं आयुष्य गेलं आहे.

यावर ही तिने फार सहजतेने उत्तर दिले की, आपल्या समाजात स्त्रिया कोणत्याही बदलाच्या किंवा नवीन गोष्टीच्या 'कारक' नाहीत त्या 'वाहक' आहेत. आणि जर का त्या नव्या बदलाच्या कारक झाल्या तर त्यांना अशा पद्धतीने ट्रॉल केले जाते.

मी ऍक्टर असल्यामुळे आम्ही चोवीस तास चारचौघात येताना ,सोशल मीडिया समोर येताना सतत प्रेझेन्टेबल असले पाहिजे अशी लोकांची अपेक्षा असते जी असणं काही चुकीचे नाही. कारण ते आम्हाला तसंच इमॅजिन करत असतात. आम्ही जश्या घरात आहेत तश्या म्हणजे मेकअप न करता गेलो तर त्यांना एक धक्का बसू शकतो. मग आता आम्ही घरात आहोत मग घरात मेकअप करूनच बसू का?.. सतत सोशल मीडियावर यायचे असेल तर त्यात बंधनं का? का सतत विचार करायचा की मी छानच दिसली पाहिजे? जर वाटत असेल मेकअप करून यावेसे तर आम्ही या पण ते तुम्हाला वाटले पाहिजे चार लोकांना छान दिसले पाहिजे म्हणून नाही. बरं मी बाहेर जे मेकअप करते के माझ्या कामासाठी आणि माझ्या रोलसाठी करते . जेव्हा मी घरी असते तेव्हा मी जशी आहे तशी राहते . इन्स्टाग्रामवर जर काही पोस्ट करायचे असेल तर ते अगदी इन्स्टंटच असतं. "ताबडतोब" हाच मुळी इंस्टा या शब्दाचा अर्थ आहे.

अधिक वाचा –

जे आत्ता वाटते ते तुम्ही शेअर करा मग आता तात्काळ करायचे असेल तर त्यासाठी मी लगेच तयार का होऊ? मला ब्रा घालायची आहे , चांगले तयार व्हायचे आहे,ओढणी घ्यायची आहे हे सर्व कशासाठी ? हा जो काही दांभिकपणा आपण चालवला आहे त्यासाठी मला या पोस्टच्या माध्यमातून व्यक्त व्हावेसे वाटले .

तुला अक्कल नाही का, तो व्‍हिडिओ तू आधी डिलीट कर इथपर्यंत लोकांनी मला सांगितले

मी या सर्व गोष्टींना दुर्लक्ष केले. जेव्हा मला माझ्या जवळच्या मैत्रिणींनी सांगितले की तो व्हिडिओ डिलीट कर तेव्हा मग मला एक ट्रिगर पॉईंट मिळाला हे व्यक्त व्हायला की का मी माझ्याच घरात असताना ब्रा घालू ! हा माझा चॉइस आहे.

आपल्या घरात जरी कोणी आले तरी आपण ओढण्या घेऊन फिरतो. कशाला ? रहा की मोकळे .. सांगा नवऱ्याला मित्राला की ए बाबा हे तुला पण आहे मला पण आहे हे माझे घर आहे. मी अशीच राहीन हे सांगण्याची धमक असली पाहिजे. आणि त्यातून ही जर समोरच्या माणसाला कळत नसेल तर तो त्याच्या बुद्धिमत्तेचा प्रश्न आहे. कारण खूप झाकून ठेवलं तरी समोरच्यावर परिणाम हे होतच असतात .
प्रत्येक पुरुषाने माझ्याकडे आई बहिणीच्या नजरेने बघावे अशी माझी अपेक्षा नाही; मग तो कृती काय करतोय तर तो त्याच्या मानसिकतेचा प्रश्न आहे .

आज एक स्त्रीच स्त्रीची वैरी बनली आहे. कारण नुसते पुरुषच नाही तर स्त्रिया सुद्धा अशा व्यक्ती स्वातंत्र्याला विरोध करताना दिसतात. बाई आज नुसती गाढवा सारखी वाहक बनली संस्कृती कारक नाही आहे .जी संस्कृती जाचक असेल तर काय कामाची.

नंतर आम्ही विचारले की तुला अनेक प्रतिक्रिया आल्या असतील तर त्यातून काही महिलांना तुझ्याबरोबर व्यक्त व्हायचे आहे असे वाटले का ?

त्यावर हेमांगी म्हणाली की ब्रा काढल्यावर जसे मोकळे वाटले अगदी तसेच वाटले तुझी पोस्ट वाचून आम्हाला, असे मला माझ्या मैत्रीणी बोलल्या. तू हे दिलखुलासपणे आणि सोशल मीडियावर बोललीस त्या बद्दल त्यांनी माझे आभार मानले.

मला कोणती ही चळवळ सुरु करायची म्हणून मी हे केलेलं नाहीये. आपल्याकडे तेवढ्या दीर्घकाळापासून सामाजिक चळवळी सुरू आहेत यामध्ये पुरुषांची मानसिकता बदलली आहे का ?

यावर ही तिने फार उत्तम उदाहरण दिले की, चळवळ ही घरातून सुरू करावी. यासाठी रस्त्यावर उतरायची गरज नसते. करायचीच असेल तर आधी घरातल्या पुरुषांची मानसिकता बदला आणि तिथून सुरुवात करा.

तेव्हा हेमांगी कवी कुठे होत्या

याच अनुषंगाने आम्ही त्यांना प्रश्न केला की भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी म्हंटले होते की शिर्डीतील साई मंदिरात ड्रेस कोडविरोधात आम्ही आंदोलन केले तेव्हा हेमांगी कुठे होत्या यावर तुझी प्रतिक्रिया काय आहे ?

यावर त्या म्हणाल्या की कधी काय होते की त्या त्या विषयाचे आपल्याला संपूर्ण आकलन नसते. त्यामुळे अर्धवट ज्ञानामुळे कोणत्या ही विषयावर बोलणे मला योग्य वाटत नाही.

खरंतर हा विषय माझ्याकडून राहून गेला माझ्या कामामुळे तो लक्षात नाही आला. त्यामुळे बोलता नाही आले पण असे असेल तर तृप्ती देसाईंचे अभिनंदन !

ब्रा सारखा विषय हा महिलांसाठी सतत दबावाखाली ठेवणारा आहे किंवा कॉन्शिअस करणारा त्यांना मोकळेपणाने वावरण्यासाठी अडसर निर्माण होतो का ?

यावर ती अगदी सहजतेने म्हणाली की, बाईनेचका नेहमी लाज बाळगायची? समानतेचे धडे देणारे पुरुष अशावेळी समानता का दाखवत नाहीत ?

जे लोक तुम्हाला ट्रोल करत आहे अश्यात काय उत्तर देशील. असं जेव्हा विचारले तेव्हा त्या म्हणाल्या की, सर्व ट्रोलर्स काही ठराविकच वाक्य बोलतात. तेच सगळीकडे फिरतात त्यामुळे त्यात नवीन काही नाही ..

महिलांनी मोकळे राहा आणि हवे तसे जगा, असे असले पाहिजे तर यावर तू महिलांना खास करून काय सांगशील ?

जर कोणत्या गोष्टीचा त्रास होत असेल तर तिथे महिलांनी बोललेच पाहिजे, असं मला वाटतं. कारण व्यक्तीस्वातंत्र्य आज प्रत्येक स्त्रीचा अधिकार आहे.

अधिक वाचा – 

पाहा व्हिडिओ – "ब्रा आणि बुब्ज वर मी बोलले कारण…" | हेमांगी कवी Exclusive

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT