Latest

बेळगाव जिल्ह्यातील जवान मंजुनाथ गौडन्नावर यांना नागालँडमध्ये वीरमरण

दीपक दि. भांदिगरे

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा : बेळगाव जिल्ह्यातील गोकाक तालुक्यातील जवानाला वीरमरण आले आहे. मंजुनाथ अप्पाणा गौडन्नावर (वय 38, शिवापूर, कोन्नूर) असे वीरमरण आलेल्या जवानाचे नाव आहे. नागालँड सीमेवर गस्त घालत असताना जंगल भागात मोटारीचा अपघात झाला. त्यात त्यांना वीरमरण आले. या घटनेने बेळगाव जिल्ह्यात शोककळा पसरली आहे.

अधिक वाचा : 

मंजुनाथ हे गेल्या अठरा वर्षांपासून मद्रास इंजिनियरिंग ग्रुपमध्ये सेवा बजावत होते. सध्या ते नागालँडच्या सीमेवर वाहन चालक म्हणून कार्यरत होते.

अधिक वाचा : 

रविवारी ते गस्तीवर असताना त्यांच्या वाहनाला अपघात झाला. यामध्ये त्यांना वीरमरण आले.

त्यांचे पार्थिव सोमवारी 12 रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास गोवा येथे येणार आहे. तेथून ते त्यांच्या मूळ गावी नेण्यात येणार आहे. शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

पहा व्हिडिओ : हिरण्यकेशीकाठी अश्मयुगीन संस्कृतीच्या पाऊलखुणा

SCROLL FOR NEXT