Latest

बीड : युसुफ वडगाव येथे वीज पडून एक तरुण ठार; एक जखमी

निलेश पोतदार

केज ; पुढारी वृत्‍तसेवा केज तालुक्यातील युसुफवडगाव येथे वीज पडून एक (२० वर्षीय) तरुणाचा जागीच अंत झाला. यावेळी त्याच्या सोबतचा एक मित्रही जखमी झाला आहे.

या बाबतची अधिक माहिती अशी की, गुरूवार दि. १३ एप्रिल रोजी सायंकाळी ६:०० वाजता केज तालुक्यातील संकेत गित्ते रा. धोत्रा ता. केज आणि सुशांत विक्रम वाकळे रा. केज हे दोघे युसुफवडगाव येथून सोनीजवळा मार्गे केजकडे येत होते. यावेळी रस्त्यात विजेच्या गडगडाटासह पाऊस सुरू झाला. ते दोघे युसुफवडगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रापासून मोटार सायकल वरून जात होते. यावेळी त्यांच्या अंगावर वीज पडली. यात संकेत गित्ते रा. धोत्रा ता. केज हा जागीच ठार झाला. त्याचा मित्र सुशांत विक्रम वाकळे रा. केज हा जखमी झालेला आहे.

अपघाताची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे हे घटनास्थळी दाखल झाले. तसेच तहसीलदार डी. सी. मेंडके यांनी या नैसर्गिक आपत्तीची माहिती वरिष्ठांना कळविली आहे.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT