लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये परिषद ; बार्टी महासंचालक सुनिल वारे यांची माहिती | पुढारी

लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये परिषद ; बार्टी महासंचालक सुनिल वारे यांची माहिती

पुणे : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स’मधून पदवी घेतल्याच्या ऐतिहासिक घटनेला यंदा शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेतर्फे (बार्टी) ‘लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स’ येथे आंतरराष्ट्रीय परिषदेचे नियोजन केले जात आहे. तसेच लंडनमधील जगप्रसिद्ध मादाम तुसाँ संग्रहालयात बाबासाहेबांचा पुतळा उभारण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत, अशी माहिती ‘बार्टी’चे महासंचालक सुनील वारे पत्रकार परिषदेत दिली.

‘डॉ. आंबेडकरांनी 1923 मध्ये ‘लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स’मधून पीएच.डी.ची पदवी घेतली. त्यांनी ‘प्रॉब्लेम ऑफ रुपी’ हा प्रबंध सादर केला होता. या घटनेच्या शताब्दीनिमित्त ‘लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स’ येथे आंतरराष्ट्रीय परिषद घेण्यात येणार आहे. त्यामध्ये नोबेल पुरस्कार विजेत्यांना निमंत्रित केले जाणार आहे. बाबासाहेबांच्या आयुष्यात महत्त्वाचे स्थान असलेल्या मुंबई, ऑक्सफर्ड व केंबि—ज विद्यापीठांनी या परिषदेत सहभागी व्हावे, यासाठी पाठपुरावा सुरू आहे. त्यासोबतच मादाम तुसाँ संग्रहालयात आंबेडकरांचा मेणाचा पुतळा उभारण्यासाठी प्रयत्न केले जात असून, त्यासाठी सुमारे तीस ते चाळीस लाख रुपये खर्च अपेक्षित आहे,’

असेही वारे यांनी सांगितले. ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने ‘बार्टी’तर्फे ’घरोघरी संविधान’ ही मोहीम राबविण्यात येत आहे. त्यासाठी राज्यघटनेच्या दहा हजार प्रतींची मागणी नोंदविण्यात आली असून, ‘बार्टी’च्या समतादूतांच्या माध्यमातून गावोगावी राज्यघटनेचे वितरण केले जाणार आहे. येरवडा येथील शासकीय दालनात राज्यघटनेची प्रत उपलब्ध होईल,’ असेही त्यांनी सांगितले.

परदेशी भाषांचे प्रशिक्षण
‘बार्टी’तर्फे परदेशात नोकरी करण्याची इच्छा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी कौशल्य विकास प्रशिक्षण राबविण्यात येणार आहे. त्या अंतर्गत विद्यार्थ्यांना जर्मन, जपानी, रशियन, चायनीज, फ्रेंच, स्पॅनिश आदी परदेशी भाषांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. याशिवाय अनुसूचित जातीतील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील चौदाशे गुणवान विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी आणि वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशास

Back to top button