Latest

नुसरत भरूचा हिला ‘लव रंजन’ च्या सेटवर अटॅक

अनुराधा कोरवी

मुंबई ; पुढारी ऑनलाईन : बॉलिवूड अभिनेत्री नुसरत भरुचा हिला 'लव रंजन' या चित्रपटाच्या सेटवर चक्कर आल्याने ती खाली कोसळली. यानंतर नुसरत भरूचा हिला मुंबईतील हिंदुजा हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे.

मिळालेल्या माहितीनिसार,नुसरतच्या 'लव रंजन' या चित्रपटाचे शूटिंग मुंबईत गेल्या २० ते २५ दिवसापासून सुरू होते. यादरम्यान नुसरतची अचानक तब्येत बिघडली आणि ती सेटवरच कोसळली.

यानंतर चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्मात्यानी ताबोडतोब 'लव रंजन' चित्रपटाचे शूटिंग थांबवून तिला दवाखान्यात दाखल केले. यानंतर डॉक्टरांनी तिला व्हर्टीगो झटका आल्याचे सांगत बेडरेस्ट घेण्यास सांगितले आहे.

माझी प्रकृती स्थिर

या घटनेबाबत नुसरतने स्वत: माहिती देताना सांगितले की, 'सध्या माझी प्रकृती स्थिर आहे. कामाचा तणाव आल्याने व्हर्टीगोचा अटॅक आल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तसेच मला १५ दिवस बेडरेस्ट घेण्यासही सांगितले. यावेळी माझे ब्लड प्रेशर कमी झाले होते. मी लवकरच ठिक होत आहे.'

नुसरत भरूचाने 'प्यार का पंचनामा२', 'सोनू की टीटू की स्वीटी' आणि 'छलांग' या चित्रपटात काम केले. याशिवाय तिचे आगामी 'राम सेतु', 'हुडदंग' आणि 'छोरी' या चित्रपटात दिसणार आहे. 'प्यार का पंचनामा २' या चित्रपटाने नुसरत भरूचाला वेगळी ओळख करून दिली. नुसरत सोशल मीडियावर ॲक्टीव्ह असून ती नेहमी आपले फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते.

हेही वाचलंत का? 

पाहा : सोनपरी मृणाल कुलकर्णीशी खास गप्पा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT