Latest

नाशिक : महसूल आयुक्तालयावर आदिवासींची धडक ; घोषणांनी दणाणला परिसर

गणेश सोनवणे

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व च्या वतीने माजी आमदार जे. पी. गावित यांच्या नेतृत्वाखाली आदिवासींच्या विविध मागण्यांसाठी सोमवारी (दि.20) विभागीय महसूल आयुक्तालयावर मोर्चा काढण्यात आला. आंदोलनात हजारो आदिवासी सहभागी झाले होते.

यावेळी महसूल उपआयुक्त गोरख गाडीलकर यांना माजी आ. गावित यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने दिलेल्या निवेदनात म्हटले की, वनाधिकार कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करून अपात्र करण्यात आलेले दावे पात्र करावे, दावेदारांच्या कब्जे वहीवाटीत असलेली 4 हेक्टर (10 एकर) पर्यंतची जमीन मोजून 7/12 तयार करावा. नार-पार-तापी-नर्मदा, दमणगंगा-वाघ पिंजाळ नद्यांचे पाणी नद्या जोडणारा प्रकल्प तत्काळ रद्द करावा, जुने अपूर्ण पाझर तलाव व ल. पा. योजना सुरू करावी. जलजीवन मिशन अंतर्गत मंजूर पाणीपुरवठ्यांच्या योजना ठेकेदारांकडून पूर्ण करून घ्याव्यात, गरजू कुटुंबांना प्रधानमंत्री आवास 'ड' घरकुल योजना तत्काळ मंजूर करावी. आदिवासींच्या राखीव जागांवर बोगस आदिवासींची केलेली भरती रद्द करावी. जिल्ह्यातील कांदा लागवडीच्या खर्चाच्या दीडपट भाव मिळावा आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. अशा मागण्यांचा यात सहभाग आहे. निवेदनावर माजी आ. गावित यांच्यासह इरफान शेख, सुनील मालुसरे, भिका राठोड, सावळीराम पवार, इंद्रजित गावित, हनुमान गुंजाळ, रमेश चौधरी, आप्पा भोले, मोहन जाधव, सुभाष चौधरी, संजाबाई खंबाईत, सुवर्णा गांगू, वावसे बागू आदींची नावे आहेत.

घोषणांनी परिसर दणाणला
पेठ, सुरगाणा तालुक्यासह जिल्ह्यातील विविध भागांतून आलेल्या आदिवासींनी हातात झेंडे घेत घोषणाबाजी केली. त्यामुळे परिसर दणाणून गेला होता. या ठिकाणी मान्यवरांनी आंदोलकांना मार्गदर्शन केले.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT