Latest

देव पटेलच्या Monkey Man चा ट्रेलर रिलीज, शोभिता धुलिपाला…

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : ऑस्कर नॉमिनेटेड अभिनेता देव पटेलचा आगामी चित्रपट 'मंकी मॅन' सध्या चर्चेत आहे. (Monkey Man ) या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. देव पटेलला 'स्लमडॉग मिलिनेयर'मधून लोकप्रियता मिळाली होती. आता तो नवा ॲक्शन थ्रिलर चित्रपट 'मंकी मॅन'मधून पुन्हा एकदा भेटीला येतोय. या चित्रपटामध्ये भरपूर ॲक्शन पाहायला मिळेल. या चित्रपटाच्या माध्यमातून देव पटेल आपला डायरेक्टोरियल डेब्यू करणार आहे. (Monkey Man )

संबंधित बातम्या –

चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर प्रेक्षकांना आता मंकी मॅनची उत्सुकता आहे. ट्रेलरमध्ये देवची भूमिका एक अंडरग्राउंड फाईट क्लबच्या रूपात दाखवण्यात आली आहे. पैशांसाठी काही प्रसिद्ध फायटर्स आपल्या कलेचे प्रदर्शन करतात. ट्रेलरमध्ये त्याच्या बालपणीची झलक देखील दाखवण्यात आली आहे.

शोभिताची हॉलीवूडमध्ये एंट्री

देव पटेलच्या या चित्रपटाची अभिनेत्री शोभिता धूलिपाला या माध्यमातून हॉलीवूड डेब्यू करत आहे. आता हॉलीवूडमध्ये ती काय धुमाकूळ घालणार, हे पाहावे लागेल.

SCROLL FOR NEXT