Latest

Cold Milk Benefits : थंड दुधाचेही असतात लाभ

Arun Patil

नवी दिल्ली : दुधामधील जीवाणू किंवा अन्य रोगजंतू नष्ट होण्यासाठी आपण दूध उकळून पितो. मात्र गरमच दूध लाभदायक ठरते असे नाही. थंड दुधाचेही (Cold Milk Benefits) काही लाभ असतात, असे तज्ज्ञ सांगतात.

अनेकांच्या दिवसाची सुरुवात दुधाने (Cold Milk Benefits) होते. एखाद्या दिवशी त्यांनी नाश्त्यात दूध प्यायले नाही तर त्यांचा दिवस अपूर्ण राहतो. दुधाचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. याने आपल्या शरीराला मुबलक प्रमाणात पोषक तत्त्व मिळतात आणि उन्हाळ्यात ते आपल्या शरीरासाठी उत्तम असते. यामध्ये कॅल्शियम सोबत व्हिटॅमिन 'डी' देखील असते जे आरोग्य चांगले आणि निरोगी ठेवते.

हेल्दी फूडमध्ये दूध येते. यामुळे कॅलरीज बर्न होऊन वजन नियंत्रणात राहते. याशिवाय शरीरात हेल्दी फॅट्स बनवून रक्तदाब नियंत्रणात ठेवतो. वजन कमी करण्यासाठी थंड दूध (Cold Milk Benefits) पिणे लाभदायक ठरते. कारण यामध्ये कॅल्शियम मुबलक प्रमाणात आढळते, जे पचनक्रिया सुरळीत राहण्यास मदत होते आणि शरीरातील अतिरिक्त कॅलरीज बर्न होतात.

थंड दूध प्यायल्याने (Cold Milk Benefits) जास्त भूक लागत नाही. त्यामुळे वजन कमी होते. दररोज थंड दुधाचे सेवन केल्याने पोटातील अ‍ॅसिडिटी कमी होण्यासही मदत होते. तुम्हाला अस्वस्थ वाटत असेल तरीही तुम्ही थंड दुधाचे सेवन करू शकता. दूध शरीराला मुबलक प्रमाणात हायड्रेट ठेवते. कारण दुधात पोटॅशियम आणि सोडियम आढळतात, जे किडनीसाठी चांगले आहे. अवेळी भूक लागल्यावर थंड दूध प्या. तुम्ही त्यात थोडी कॉफीही टाकू शकता. याने तुम्हाला त्यात चव तर मिळेलच सोबतच तुमचे पोट जास्त काळ भरलेले राहते.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT