Latest

ती परत आलीये : पाहिला का तिचा चेहरा?

स्वालिया न. शिकलगार

मुंबई; पुढारी ऑनलाईन : झी मराठी वाहिनीवरील ती परत आलीये या आगामी मालिकेची चर्चा सर्वत्र सुरू आहे. संपूर्ण महाराष्ट्राला एकच प्रश्न पडला आहे ती परत आलीये म्हणजे नक्की कोण? तिची झलक नुकतीच झी मराठीवर मालिकेच्या नवीन प्रोमो मधून प्रेक्षकांना पाहायला मिळाली.

अधिक वाचा-

एक चित्तथरारक चेहरा आणि त्यामागे अंगावर भीतीने काटा आणणारं बॅकग्राउंड म्युजिक असलेला हा प्रोमो पाहून अनेकांची झोप उडाली.

अधिक वाचा-

झी मराठीवर रात्री हा प्रोमो प्रसारित झाला आणि या प्रोमो नंतर एकच खळबळ उडाली ती नक्की कोण आहे? हा भयानक चेहरा आहे कि मुखवटा? प्रोमोमध्ये विजय कदम म्हणतात, आता तिची झलक संपूर्ण महाराष्ट्राने पाहिली.

ती परत आलीये

तिचा भयावह चेहरा प्रेक्षकांच्या भेटीस

विजय कदम म्हणाले, "तिचा हा भयावह चेहरा मालिकेत देखील प्रेक्षकांच्या भेटीस येईल. तिच्या येण्याचा प्रवास खूप दूरवरचा आहे.

अधिक वाचा –

त्यामुळे सध्या तिच्या भोवती गूढ वलय रंगवण्यात आम्ही सगळे कलाकार रमलो आहोत. त्यामुळे ती कोण आहे हे प्रेक्षकांना मालिकेसोबत उलगडत जाईल."

अधिक वाचा –

विजय कदम व्यतिरिक्त या मालिकेतील अन्य कलाकार असणार आहेत. पण, अद्याप याची माहिती अजूनही गुलदस्त्यात ठेवली आहे.

आता १६ ऑगस्ट रोजीच ती आणि तिची कहाणी प्रेक्षकांच्या सर्व प्रश्नांची उत्तरं देईल.

तेव्हा पाहायला विसरू नका ती परत आलीये १६ ऑगस्ट रोजी रात्री १०.३० वाजता फक्त आपल्या झी मराठीवर.

हेदेखील वाचा- 

SCROLL FOR NEXT