मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : अश्लिल चित्रपटात अभिनय केल्याप्रकरणी वादाच्या भोवर्यात अडकलेल्या अभिनेत्री गेहना वाशिष्ट हिला दिलासा देण्यास मुंबई सत्र न्यायालयाने नकार दिला. अतिरिक्त सत्र न्यायाधीश सोनाली अग्रवाल यांनी गेहनाचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला.
पॉर्न चित्रपटप्रकरणात पोलिसांकडून अटक होऊ नये, म्हणून गेहनाने अटकपूर्व जामिनासाठी मुंबई सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्या अर्जावर गुरुवारी अतिरिक्त सत्र न्यायाधीश सोनाली अग्रवाल यांच्यासमोर सुनावणी झाली.
यावेळी राज्य सरकारने जोरदार विरोध केला. दाखल कऱण्यात आलेल्या एफआयआरमध्ये गंभीर स्वरुपाचे आरोप असून आरोपींनी पीडितांना चुंबन आणि लैंगिक दृश्ये करण्यास भाग पाडले आहे, असे सांगितले. याची गंभीर दाखल न्यायालयाने घेतली.
आरोपी विरोधात दाखल केलेला गुन्हा आणि परिस्थितींचा विचार करता दिलासा देता येणार नाही, असे स्पष्ट करत न्यायालयाने गेहना वाशिष्ट हिला दिलासा देण्यास नकार देत तिचा अर्ज फेटाळून लावला.
या प्रकरणातील दुसरी आरोपी आणि मॉडेल शर्लिन चोप्राचाही अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने नुकताच फेटाळून लावला आहे.