Latest

ज्युनिअर एनटीआरचा आरआरआर झाला लिक? कमाईवर परिणाम होण्याची शक्यता

अनुराधा कोरवी

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन: डायरेक्टर एसएस राजामौली यांचा सर्वात महागडा आणि मोस्ट अवेटेड 'आरआरआर' हा चित्रपट शुक्रवारी रिलिज होताच लिकही झाला. याबरोबरच तो पायरसीचा शिकारही ठरला.

दोन क्रांतिकारी अल्लूरी सीताराम व कोमाराम भीम यांनी ब्रिटिश राजवट आणि हैदराबादच्या निजामाविरुद्ध दिलेल्या लढ्यावर अवलंबून आहे. चित्रपटात अल्लूरीच्या भूमिकेत रामचरण तर कोमारामच्या भूमिकेत ज्युनिअर एनटीआर आहे.

एशियोनट न्यूजेबल या संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार आरआरआर हा चित्रपट कथितपणे ऑनलाईनवर लिक करण्यात आला आहे. यास पायरसी आधारित प्लॅटफॉर्मवर प्रसारित करण्यात येत आहे. मोठ्या पडद्यावर रिलिज होण्यापूर्वीच काही वेबसाईटवर महागडा चित्रपट लिक झाल्याने चित्रपटाच्या कमाईवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

हेही वाचलंत का? 

SCROLL FOR NEXT