सांगली : एमपीएससी परीक्षेत ‘नालंदा’चा झेंडा | पुढारी

सांगली : एमपीएससी परीक्षेत ‘नालंदा’चा झेंडा

सांगली : पुढारी वृत्तसेवा
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट ब मधील पोलिस उपनिरीक्षक (झडख) संवर्गाचा अंतिम निकाल शुक्रवारी जाहीर करण्यात आला आहे.

वंदना विल्हाट राज्यात मुलींमध्ये तिसरी 

सदर परीक्षेमध्ये पुणे जिल्ह्यातील नीलेश विलास बर्वे हे राज्यातून प्रथम आले आहेत. सांगली जिल्ह्यातील नालंदा अ‍ॅकॅडमीमधील अनेक विद्यार्थी अंतिम यादीत झळकले आहेत. सतीश पवार हे अराखीव गटातून 44 व्या, सोमनाथ पवार 108 व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत. मुलींमध्ये मिरजेच्या तेहसीन बेगने इतर मागास प्रवर्ग मुलींच्यातून 28 वा, वंदना विल्हाट अनुसूचित जमाती (मुली) यातून तिसरा, तर अल्पा खांडेकर यांनी अनुसूचित जाती (मुली) प्रवर्गातून 14 व्या क्रमांकावर मजल मारली. या यशामुळे नालंदा अ‍ॅकॅडमीतील यशस्वी विद्यार्थी व शिक्षकांचे अभिनंदन होत आहे. या सर्वांना नालंदा अकादमी मधील सागर इसापुरे, अनिकेत साळुंखे, सचिन साळुंखे व इतर मार्गदर्शक यांचे मार्गदर्शन लाभले. मैदानी चाचणीसाठी आर. के. स्पोर्टस्चे राहुल यांचे सहकार्य
लाभले.

Back to top button