चिपळूण ; पुढारी वृत्तसेवा : मागच्या महिन्यात चिपळूण शहराला महापुराचा मोठा विळखा होता. दरम्यान महापुराने चिपळूण शहरातील छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले. अशातच चिपळूणचा तरूण सामाजिक कार्यकर्ता आदित्य कुलकर्णी याचे निधन झाले. शहरातील जुना कालभैरव मंदिरा जवळील आदित्य कुलकर्णी (वय २९) या तरुणाचे डेंग्यू सदृश तापाने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली.
आदित्य कुलकर्णी सामाजीक कामात नेहमी अग्रेसर असायचा यामुळे त्याच्या मृत्यूने शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
महापुरानंतर शहरात ताप व सर्दीचे रुग्ण सापडत आहेतय. पुरानंतर हा पहिला बळी ठरला आहे. कोरोनाने हॉटेल व्यवसाय ठप्प होता. तरीही त्यातून सावरत असताना महापुराने त्याचे सर्वस्व लुटलं… स्वच्छता करुन पुन्हा एकदा उभं राहण्याची तयारी करत असतानाच काळाने त्याच्यावर घाला घातला….
फेसबुकवर मुक्त लिखाण करणाऱ्या आदित्यचा सोशल मीडियावरचा गोतावळा मोठा आहे. लिखाण करण्याची त्याची पद्धत वेगळी असल्याने त्याचा फेसबुकवर फॅन फॉलोवर मोठा होता. मागच्या काही दिवसांपुर्वी त्याचे लग्न देखील ठरले होते.
पुरानंतर साफसफाई करून तो आजारी पडला. त्यात कोरोना लस देखील घेतली होती. त्यामुळे त्रास होऊन प्लेट लेट कमी झाल्या. रविवारी सायंकाळी शहरातील खासगी रुग्णालयात त्याचा मृत्यू झाल्या. चिपळूण परिसरात खबर पोहोचताच आदित्य गेल्याचे दु:ख अनेकांना झाले
श्रावणी सोमवारच्या मुहूर्तावर लसवंत झालो खरा पण गेले तीन दिवस लसीने शरीर यंत्रणेत जी ढवळाढवळ केल्ये त्याने अक्षरशः वैतागलोय. भूक मंदावल्ये , अंगदुखी , सलग तीन दिवस 100+ ताप … बेडरेस्ट शिवाय उपाय नाही. गेल्यावर्षी कोरोनाची लक्षणं असताना सुद्धा दोन दिवसात बरा झालो होतो आणि आता लस घेतल्यावर हे …
कामाचा लोड भयानक आहे. महापुराबद्दल रुदन करण्याची लोकांची मर्यादा संपत आल्ये. कोणी येवो – न येवो मदत कार्य सुरू राहीलच
पण सगळ्यांना शेवटी स्वतःचं या परिस्थितीतून बाहेर यावं लागणार आहे.
तीन दिवसात काही अपडेट नाही म्हणून मित्रांनी विचारपूस केली त्यासाठी पोस्टप्रपंच.
हे ही पाहा :