सातारा; पुढारी वृत्तसेवा; सातारा शहर पोलिसांनी गुणरत्न सदावर्ते यांना गुरुवारी रात्री अटक केल्यानंतर आज सातारा न्यायालयात हजर करण्यात आले. या पार्श्वभुमीवर शहर पोलिस ठाण्याच्या परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
ऑक्टोबर २०२० मध्ये सातारा शहर पोलिस ठाण्यात मराठा आरक्षण प्रकरणी एका वृत्तवाहिनीवरती आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबाबच्या गुन्ह्यात गुणरत्न सदावर्ते यांना सातारा पोलिसांनी काल (गुरुवार) मुंबईतून ताब्यात घेतलं आहे.
आज सातारा पोलिस त्यांना जिल्हा व सत्र न्यायालयात हजर करण्यात आले आहे. दरम्यान सातारा पोलीस ठाण्यात गुरुवारी सदावर्ते यांना आणल्यानंतर काही मराठा संघटनांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या विरोधात पोलीस ठाण्यासमोर घोषणाबाजी केली होती. आज कोर्टात सरकार पक्ष व बचाव पक्ष यांचा युक्तिवाद होणार असून, त्यावर कोणता निर्णय होणार याकडे लक्ष लागले आहे. त्या पार्श्वभूमीवरआज पोलीस कोठडी व न्यायालय परिसरात सातारा पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.