Latest

गर्भश्रीमंत BCCI ने ऑलिम्पिक पदकवीरांसाठी पेटारा उघडला!

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : BCCI : जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड BCCI ऑलिम्पिकमधील भारतीय तुकडीच्या कामगिरीने भलतेच खुश आहे. कदाचित याच कारणामुळे पदक विजेत्यांमध्ये एकूण 4 कोटी रुपये वितरित करण्याची घोषणा करण्यात आली आहे.

शनिवारी टोकियोमध्ये नीरज चोप्राने सुवर्ण जिंकल्याने भारताच्या ऑलिम्पिक मोहिमेचा सुखद शेवट झाला.

नीरजला एक कोटी रुपये

भालाफेकमध्ये सुवर्णपदक जिंकून इतिहास रचणाऱ्या नीरज चोप्राला BCCI एक कोटी रुपये देणार आहे. सुवर्णपदकी भाला फेकणाऱ्या नीरज चोप्राने चमकदार कामगिरीसह ऑलिम्पिक इतिहासातील भारताचे दुसरे वैयक्तिक सुवर्णपदक जिंकले. ट्रॅक आणि फील्डमध्ये यश मिळवणारा तो पहिले खेळाडू ठरला.

50 लाख रौप्य आणि 25 लाख कांस्यपदक विजेत्याला

बीसीसीआय सचिव जय शहा यांनी एका ट्विटमध्ये रौप्य पदक विजेते – वेटलिफ्टर मीराबाई चानू आणि कुस्तीपटू रवी दहिया यांना प्रत्येकी 50 लाखांचे बक्षीस जाहीर केले. कांस्यपदक विजेता कुस्तीपटू बजरंग पुनिया, बॉक्सर लवलिना बोर्गोहेन आणि बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू यांना प्रत्येकी 25 लाख रुपये मिळतील.

1.25 कोटी रुपये राष्ट्रीय क्रीडा संघाला

पुरुषांच्या हॉकी संघाने 41 वर्षांनंतर आपले पहिले ऑलिम्पिक पदक (कांस्य) जिंकले. त्यांना 1.25 कोटी रुपये दिले जातील. इंडियन प्रीमियर लीग फ्रँचायझी चेन्नई सुपर किंग्सने नीरज चोप्रासाठी 1 कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले.

सीएसके एक कोटी रुपयेही देईल

चेन्नई सुपर किंग्सने एका निवेदनात म्हटले आहे की, "चेन्नई सुपर किंग्स नीरज चोप्राला त्याच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल एक कोटी रुपयांचा पुरस्कार देईल. चेन्नई सुपर किंग्स नीरज चोप्राला सन्मान देण्यासाठी 8758 क्रमांकाची विशेष जर्सी तयार करेल.

हे ही वाचलं का?

https://youtu.be/r-lG9gBXOsA

SCROLL FOR NEXT