Latest

कोल्‍हापूर : पुलाची शिरोलीत दोन सिरॅमिक दुकानांना आग; कोट्यावधी रुपयांचे नुकसान

निलेश पोतदार

शिरोली एमआयडीसी; पुढारी वृत्तसेवा पुलाची शिरोली येथे कोल्हापूर-सांगली राष्ट्रीय महामार्गालगत मार्बल लाईन टोलनाक्या जवळील इंगळे सिरॅमिक सेंटरला पहाटे पाच वाजण्याच्या सुमाराला आग लागली. दुकानांमध्ये प्लायवूड, रबरी मॅट असल्याने आगीने रौद्ररूप धारण केले. हि आग विझविण्यासाठी कोल्हापूर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलास पाचारण केले. अग्निशमन बंब येईपर्यंत इंगळे सिरॅमिक सेंटर जळून आगीच्या भक्षस्थानी पडले.

तर या दुकानालगत चंदवानी सिरॅमिक दुकान आहे. इंगळे सिरॅमिक सेंटरला लागलेल्या आगीने चंदवानी सिरॅमिक सेंटरच्या वातानुकूलित मशीनला आग लागून त्याची वायर जळत ती चंदवानी सिरॅमिक मध्ये घुसली. अग्निशमन दलाचा बंब एकच असल्याने सुरुवातीला आग आटोक्यात आणणे मुश्किलीचे बनले होते. त्यानंतर अन्य अग्निशामन दलाच्या बंबानाही पाचारण करण्यात आले.

तोपर्यंत चंदवानी सिरॅमिक दुकानाच्या दुसऱ्या मजल्यावर अति महागडे साहित्य जळून खाक झाले. दरम्यान अग्निशमन दलाच्या जवानांनी तिन्ही बाजूंनी बंब उभे करून पाण्याचा मारा केला. तर काही जवानांनी दुसऱ्या मजल्यावर चढून काचा खिडक्या तोडून आत प्रवेश करून पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली. जवळपास तीन तास आग विझवण्याचे प्रयत्न सुरू होते. या आगीमध्ये दोन्ही दुकानांचे कोठ्यावधी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT