Smriti Mandhana : आरसीबीच्या कर्णधारपदी स्मृती मानधनाची निवड | पुढारी

Smriti Mandhana : आरसीबीच्या कर्णधारपदी स्मृती मानधनाची निवड

पुढारी ऑनलाईन डेस्क : महिला प्रीमियर लीगसाठी रॉयल चॅलेंजर्स (RCB) बंगळूरने आपल्या संघाच्या कर्णधार पदी स्मृती मानधनाची (Smriti Mandhana) निवड केली आहे. फ्रँचायझीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करून ही माहिती दिली. या व्हिडिओमध्ये विराट कोहली (Virat Kohli) आणि फाफ डू प्लेसिस डब्ल्यूपीएलसाठी आरसीबीच्या कर्णधारपदाची घोषणा करताना दिसत आहेत.

महिला आयपीएलच्या (WPL 2023) पहिल्या हंगामाला चार मार्चपासून सुरुवात होणार आहे. नवी मुंबईतील डी वाय पाटील मैदानावर मुंबई आणि गुजरातमध्ये पहिला सामना रंगणार आहे. त्यामुळे आता संघाचे नेतृत्व कोण करणार? याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे. अशातच आता आयसीबीने आपल्या संघाच्या कर्णधारची घोषणा करून दणक्यात सुरुवात केली आहे. खरेतर स्मृती हिच आरसीबीची कर्णधार होईल अशी सर्वांना अपेक्षा होती आण्इ झालेही तसेच.

आम्ही स्मृतीकडे नेतृत्वाची भूमिका सोपवली आहे आणि आम्हाला विश्वास आहे की स्मृती आरसीबीला आणखी उंचीवर नेईल, असे आरसीबीचे अध्यक्ष प्रथमेश मिश्रा यांनी म्हटले आहे. विराट कोहलीने आपल्या खास अंदाजात स्मृतीला शुभेच्छा दिल्या आहेत. विराटनंतर आता पुन्हा 18 नंबरची जर्सी (Number 18 jersey) कॅप्टनसी सांभाळणार आहे.

BCCI ने WPL चे वेळापत्रक जाहीर केलं आहे. या स्पर्धेत मुंबई इंडियन्स, गुजरात जायंट्स, यूपी वॉरीयर्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि दिल्ली कॅपिटल्स हे पाच संघ भाग घेतील. सर्व सामने मुंबईतील दोन मैदानांवर होणार आहेत. डीवाय पाटील स्टेजियमवर ४ मार्चपासून लीग सुरू होणार आहे. गुजरात आणि मुंबई पहिला सामन्यात भिडतील. अंतिम सामना २६ मार्चला होणार आहे. अंतिम सामना ब्रेबॉर्न स्टेडियमवर होणार आहे.

माजी कर्णधार मिताली राजची गुजरात जायंट्स संघाची मार्गदर्शक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर झुलन गोस्वामी ही मुंबई इंडियन्सची मार्गदर्शक आणि गोलंदाजी प्रशिक्षक आहे.

Back to top button