बेळगाव, पुढारी वृत्तसेवा : पश्चिम शिक्षक मतदारसंघातून विधान परिषदेचे विद्यमान सभापती बसवराज होरट्टी विजयाच्या मार्गावर आहेत. या मतदारसंघात सुमारे अकरा हजार मतदान झाले असून, आतापर्यंत सुमारे दहा हजार मतदानाची मतमोजणी झाली आहे.
होरट्टी यांना आतापर्यंत ७ हजार ७० मते मिळाली आहेत. तर या मतदारसंघात एकूण ७ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. बसवराज होरटी यांनी यापूर्वी सात निवडणुका जिंकल्या आहेत. आता ते हे आठव्यांदा मैदानात उतरले होते. ११ हजार मतांपैकी ७ हजार ७० मते मिळाल्याने ते विजयाच्या मार्गावर आहेत.
होरट्टी यांच्या विजयामुळे ते देशातील पहिलेच विधान परिषदेवर आठव्यांदा निवडून जाणारे आमदार ठरतील. यापूर्वी ते निधर्मी जनता दलाचे आमदार होते. आणि नुकताच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
हेही वाचा