पोलिस चौकीत तोडफोड; परस्परविरोधी गुन्हे दाखल | पुढारी

पोलिस चौकीत तोडफोड; परस्परविरोधी गुन्हे दाखल

पिंपरी : पोलिस चौकीत घुसून तोडफोड केल्याप्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही घटना काळेवाडी येथे रविवारी घडली. शिवाजी गुरुनाथ साळुंखे (50, रा. नढेनगर, काळेवाडी) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार, ओंकार कल्याण ढवळे (रा. चिखली), रितेश दिनकर ओव्हाळ (वय 22), नंदकिशोर उर्फ बंडू नितीन महाकाल (वय 24), सिद्धार्थ संजय जगताप (वय 19), ऋषिकेश शाम कुडवे (वय 24, सर्व रा. काळेवाडी) यांच्या विरोधात दरोडाप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

याच्या परस्पर विरोधात ऋषिकेश शाम कुडवे (24, रा. काळेवाडी) यांनी फिर्याद दिली. अमान शेख, सागर तेलंग, धनंजय काळे, अविनाश उर्फ काळ्या, शुभम मोहिते, यश देशमुख (सर्व रा. पिंपरी), अजय कांबळे (थेरगाव), आकाश पवार, सत्यम भारंबे, सैफ खान (तिघेही रा. काळेवाडी) यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

Back to top button