नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : बॉलीवूड स्टार अक्षय कुमार याची आई अरुणा भाटिया यांचे निधन जाले. या दु:खद वृत्ताची माहिती स्वत: अक्षय कुमार याने दिली आहे. अक्षयने ट्वीट करत एक भावूक पोस्ट लिहिलीय.
तो म्हणाला, मी एक असहनशील दु:ख अनुभवत आहे. माझी आई श्रीमती अरुणा भाटिया आज सकाळी शांतीपूर्वक हे जग सोडून गेली. दुसऱ्या जगात माझ्या वडिलांना जाऊन भेटली. मी आपल्या प्रार्थनांचे सन्मान करतो. मी आणि माझे कुटूंब या दु:खद घटनेतून जात आहोत.
अक्षयने मंगळवारी सकाळी आई अरुणा भाटिया यांच्या मृत्यूचे वृत्त शेअर केले. त्याने एक भावूक नोट शेअर केली. अक्षयची आई काही दिवस आधी मुंबईतील हीरानंदानी रुग्णालयात आयसीयूमध्ये दाखल करण्यात आला.
अक्षय, परदेशात त्याचा चित्रपट सिंड्रेलाचे शूटिंग करत होता. आईची तब्येत बिघडल्याने तो परत आला.
अक्षयने सोमवारी पोस्ट केली होती. "हा माझ्यासाठी आणि माझ्या परिवारासाठी खूप कठीण वेळ आहे. आपली प्रत्येकाची प्रार्थना खूप मदत करेल."
हेही वाचलं का ?