न्यूयॉर्क : अंतराळ जसे अनंत आहे तसेच अंतराळाशी संबंधित प्रयोगांचे मार्गही अनंतच आहेत. याबाबत कोण, कसा प्रयोग करील हे काही सांगता येत नाही. आता 'नासा'च्या एका माजी कर्मचार्याने अनोखा प्रयोग केला आहे. त्यांनी (eggs thrown from space) अंतराळात एक अंडे नेले आणि तेथून त्याला पृथ्वीवर सोडले!
'नासा'चे एक माजी इंजिनिअर मार्क रॉबर यांनी हा अनोखा प्रयोग केला. (eggs thrown from space) ते आता आपले एक यू ट्यूब चॅनेल चालवतात. या संपूर्ण प्रयोगाचा व्हिडीओ त्यांनी आपल्या चॅनेलवर पोस्ट केला आहे. त्यामध्ये हा प्रयोग कसा घडवून आणला हे दाखवले गेले आहे. यापूर्वीही त्यांनी असा प्रयोग करण्याचा प्रयत्न केला होता; पण त्यामधून अपेक्षित परिणाम समोर आले नव्हते. दुसर्या प्रयत्नात जे परिणाम समोर आले ते थक्क करणारे होते. या प्रयोगासाठी त्यांनी खर्चही भरपूर केला.
अंतराळातून अंड्याला सुरक्षितपणे कसे टाकावे जेणेकरून ते फुटू नये यासाठीचा हा प्रयोग होता असे त्यांनी सांगितले. पहिल्या प्रयत्नावेळी अंडे फुटले होते, (eggs thrown from space) कारण ते एका नियंत्रित वेगाने खाली आले नव्हते. त्यामुळे त्यांनी फिन्स कंट्रोलमध्ये रॉकेटची मुव्हमेंट नियंत्रित केली आणि हा प्रयोग सुरू केला. व्हिडीओत दिसते की कशाप्रकारे त्यांनी व त्यांच्या सहकार्यांनी हा प्रयोग केला. यावेळी त्यांना यश आले. रॉकेटमध्ये त्यांनी अंड्याला अशाप्रकारे फिट केले होते की पृथ्वीवर ते सुरक्षितपणे परत आले, फुटले नाही!
हेही वाचा :