Latest

अकोला : कार- दुचाकीच्या अपघातात युवक ठार

अनुराधा कोरवी

अकोला; पुढारी वृत्तसेवा : बार्शी टाकळी-पिंजर रस्त्यावरील रेडवा गावापासून काही अंतरावर कार आणि दुचाकीच्या अपघातात दुचाकीस्वार युवक जागीच ठार झाला. ही घटना बुधवारी (दि. १० एप्रिल ) रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात नीलेश बळीराम चव्हाण ( रा. काजळेश्वर ) मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.

संबंधित बातम्या 

मिळालेल्या माहितीनुसार, पिंजरकडून येणारी कार ( क्रमांक एमएच ३८ व्ही ४७४८ ) आणि बार्शीटाकळीहून पिंजरच्या दिशेने जाणारी दुचाकी ( क्रमांक एमएच ३० बी ५८७४ ) यांच्यात अपघात झाला. यामध्ये दुचाकीस्वार नीलेश बळीराम चव्हाण याचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही वाहने ताब्यात घेऊन घटनास्थळाचा पंचनामा केला आहे.

नीलेशचा मृतदेह शवविच्छेदनासाठी अकोला सर्वोपचार रुग्णालयात पाठविला आहे. याप्रकरणी कार चालकाविरुद्ध कलम ३०४ अ अन्वये पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT