Latest

यवतमाळ : माथेफिरू युवकाने एका दगडात १०० गावांचा वीजपुरवठा केला खंडित

निलेश पोतदार

एका माथेफिरु युवकाने विद्युत वाहिनीचे इन्सुलेटर फोडून तब्‍बल १०० गावांचा वीजपुरवठा खंडित केल्‍याचा प्रकार समोर आला आहे. आपल्‍या भागातील वीज गेल्‍याच्या रागातून युवकाने दगड मारून ३३ केव्ही वाहिनीचे इन्सुलेटर फोडले. परिणामी शनिवारी चार उपकेंद्र अंतर्गत येणाऱ्या शहरासह १०० गावातील वीजपुरवठा खंडित झाला. पोलिसांनी माथेफिरू युवकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. एका माथेफिरू युवकाने १०० गावांचा वीजपुरवठा खंडित केल्‍याच्या बातमीने नागरिकांमध्ये रोष व्यक्‍त करण्यात येत आहे.

महागाव तालुक्यातील कलगाव येथे दुर्गा उत्सवानिमित्त गुरुवारी सायंकाळी महाप्रसादाचा कार्यक्रम सुरू होता. त्यावेळी अचानक वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे संतप्त झालेल्या श्रीकांतने वीज वितरणचे उपकार्यकारी अभियंता विनोद चव्हाण यांना फोन करून पाच मिनिटात वीजपुरवठा सुरू करा; अन्यथा चार उपकेंद्राचा वीजपुरवठा बंद पाडण्याची धमकी दिली.

यानंतर रात्री गुंज ते महागावदरम्यान असलेला ३३ केव्ही वीजपुरवठा बंद पाडण्यासाठी त्याने खांबावर दगडफेक करून दोन पीक इन्सुलेटर फोडले. यात विजेची तार तुटून घर्षणाने महागाव, मुडाणा, फुलसावंगी आणि भवानी या चार उपकेंद्रांचा वीजपुरवठा खंडित झाला. परिणामी शेकडो गावातील नागरिकांना रात्र अंधारात काढावी लागली. प्राप्त तक्रारीवरून पोलिसांनी श्रीकांतविरुद्ध गुन्हा दाखल केला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT