Latest

बिग बॉस मराठी सिझन ४ : ‘त्या चार जणांचा ग्रुप होणार हे नक्की…’ : यशश्री

अनुराधा कोरवी

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : आज यशश्री, त्रिशूल आणि समृध्दीमध्ये बिग बॉस मराठीच्या घरातील ग्रुप आणि सदस्यांचे कोण-कोणाशी चांगले आहे? कोण- कोणाला आवडते? आणि कोणाचा ग्रुप पुढे होऊ शकतो? यावर चर्चा होताना दिसणार आहे.

त्रिशूल सांगताना दिसणार आहे की, याआधी देखील आपण बोललो आहे की आपण आपली टीम बनवू शकतो. यावर समृध्दी म्हणाली की, त्यावेळेस आपण खुपचं उडत- उडत बोललो होतो. पण, आता आपल्याला कळत आहे की परिस्थिती काय आहे ते. आपण overshadow नाही झालो पाहिजे यांच्यात. माझे, तुझे आणि यशश्रीचे सहमत आहे. म्हणजेच, आपण तिघे आता सेम मतावर आहोत. तुमची काय आहे मत अजून कोण हवंय? यशश्री म्हणाली की, रु आणि रो.

यामुळे बीग बॉस घरातील पुढाील सामना रंजक होणार आहे. सध्या कुठे नको बोलतोय हे पाहणे औत्युक्याचे ठरणार आहे. कारण स्नेहलता अमृता देशमुखच्या आणि अक्षयच्या बाजूने आहे. ती अपूर्वाच्या बाजूने पण नाहीये फार. आहे पण अपूर्वा स्ट्राँग आहे आणि म्हणूनच ती तो ग्रुप पकडून चालणार आणि त्या चार जणांचा नक्कीच ग्रुप होणार. अजून काय झालं घरात, कोणत्या चर्चा रंगल्या आणि कोणामध्ये झाला वाद हे चाहत्यांना पाहायला मिळणार आहे.

हेही वाचलंत का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT