पुढारी ऑनलाईन डेस्क : PAKvsBAN T20WC : पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात टी-20 विश्वचषक स्पर्धेतील अत्यंत महत्त्वाचा सामना खेळला जात आहे. अॅडलेडमध्ये पाकिस्तान विरुद्धच्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने 20 षटकांत 8 विकेट्स गमावून 127 धावा केल्या. याचबरोबर पाकिस्तानला विजयासाठी 128 धावांची गरज आहे. बांगलादेश संघाला चांगल्या सुरुवातीचा फायदा उठवता आला नाही आणि काही अंतराने विकेट गमावल्यामुळे त्यांना पाकिस्तानसमोर विजयासाठी मोठे लक्ष्य ठेवता आले नाही. हा सामना जिंकणारा संघ उपांत्य फेरीत प्रवेश करेल. प्रत्युत्तरात पाकिस्तान संघाची सुरुवात संथ झाली. मोहम्मद रिझवान आणि बाबर आझम या सलामीवीर जोडीने सावध पवित्रा घेत पॉवर प्लेमध्ये फटकेबाजी करणे टाळले. त्यांनी 6 षटकांमध्ये 35 धावा केल्या. यानंतरही दोघांनी 9 व्या षटकापर्यंत एकेरी-दुहेरी धाव घेत स्कोअर बोर्ड हलता ठेवला. 10 व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर शाकीबला चौकार लगावला. या षटकात 8 धावा वसूल केल्या. याच षटकात संघाचे बिनबाद अर्धशतक पूर्ण झाले. मात्र, पुढच्याच षटकात असूम अहमदने पाकला पहिला धक्का दिला. त्याने षटकाच्या तिस-या चेंडूवर बाबर आझमला तंबूचा रस्ता दाखवला. मुस्तफिझूरने त्याचा झेल पकडला. बाबरने 33 चेंडूत 25 धावा केल्या. त्याने दोन चौकार मारले. पाकिस्तानला दुसरा मोठा झटका रिझवानच्या रुपात बसला. 12व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर इबादत हुसेनने रिझवानला बाद केले. रिझवानने 32 चेंडूत 32 धावा केल्या. त्याने दोन चौकार आणि एक षटकार लगावला. 15 व्या षटकात पाकिस्तानला तिसरा धक्का बसला. लिटन दासच्या अचूक थ्रोमुळे मोहम्मद नवाज धावबाद झाला. नवाज 11 चेंडूत चार धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला.
बांगलादेशकडून नजमुल हुसेन शांतोने 54 धावा केल्या. अफिफ हुसेनने नाबाद 24 आणि सौम्या सरकारने 20 धावा केल्या. लिटन दासला केवळ 10 धावा करता आल्या. कर्णधार शाकिब अल हसन आणि नुरुल हसन यांना खातेही उघडता आले नाही. नसुम अहमद 7, मोसाद्देक हुसेन 5 आणि तस्किन अहमदने 1 धावा काढून बाद तंबूत परतले. पाकिस्तानकडून शाहीन आफ्रिदीने चार तर शादाब खानला दोन विकेट घेतल्या. हरिस रौफ आणि इफ्तिखार अहमद यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशकडून नजमुल हुसेन शांतो आणि सौम्या सरकार यांनी आक्रमक सुरुवात केली. पण 2.5 व्या षटकात 21 धावसंख्येवर लिटन दास बाद झाला. लिटन दास ऑफ स्टंपबाहेरचा चेंडू मारायला गेला. जिथे पॉइंटवर उभ्या असलेल्या शान मसूदने त्याचा झेल पकडला. दासने 8 चेंडूत 10 धावा केल्या.
बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशकडून नजमुल हुसेन शांतो आणि नजमुल हुसेन शांतो यांनी आक्रमक सुरुवात केली. पण 2.5 व्या षटकात 21 धावसंख्येवर लिटन दास बाद झाला. लिटन दास ऑफ स्टंपबाहेरचा चेंडू मारायला गेला. जिथे पॉइंटवर उभ्या असलेल्या शान मसूदने त्याचा झेल पकडला. दासने 8 चेंडूत 10 धावा केल्या. यानंतर सौम्या सरकारने शांतो सोबत संघाचा डाव सांभाळला. दोघांनी अर्धशतकी (52) भागिदारी करून धावफलक हलता ठेवला. पण, 11 व्या षटकात फिरकीपटू शादाबने बांगलादेशला सलग दोन धक्के दिले. त्यामुळे बांगलादेश बॅकफुटवर गेले आणि त्यांचा आक्रमणाला ब्रेक लागला.
शादाबने 4 थ्या चेंडूवर सौम्या सरकारला आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवले. स्विप मारताना मसूदने सौम्याचा झेल पकडला. सरकारने 17 चेंडूत 20 धावा केल्या. त्याने एक चौकार आणि एक षटकार मारला. यावेळी बांगलादेशची धावसंख्या 2 बाद 73 होती. यानंतर पुढच्याच चेंडूवर शादाब खानने शाकीब अल हसनला पायचित पकडून बांगलादेशला तिसरा झटका दिला. शादाबच्या अपीलवर पंचांनी त्याला बाद घोषित केले. मैदानावरील पंचांच्या निर्णयाविरुद्ध शाकिबने रिव्ह्यू घेतला. तिसऱ्या पंचांनीही तो आऊट असल्याचा निर्णय दिला. या निर्णयाने शाकीब निराश झाला. चेंडू बॅटला लागल्याचे त्याचे म्हणणे होते. पंचांनी त्याला समजूत काढून मैदानाबाहेर पाठवले. 11 षटकाअखेर बांगलादेशची धावसंख्या 3 बाद 74 होती.
इफ्तिखार अहमदने पाकिस्तानला चौथे यश मिळवून दिले. त्याने 14व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर नजमुल हुसेन शांतोला बाद केले. नजमुलने 48 चेंडूत 54 धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत सात चौकार मारले. नजमुलनंतर मोसाद्देक हुसेन क्रीजवर आला. 14 षटकांअखेर बांगलादेशची धावसंख्या 4 बाद 92 होती.
शाहीन आफ्रिदीने 17 व्या षटकात बांगलादेशला दुहेरी झटके दिले. त्याने षटकाच्या 2 -या आणि 5 चेंडूवर अनुक्रमे मोसाद्देक हुसेन आणि नुरुल हसन यांना बाद केले. मोसादेक 11 चेंडूत 5 धावा करून बाद झाला. त्याच्यापाठोपाठ नुरुल हसनलाही खाते न उघडता मोहम्मद हरीसने झेलबाद केले. यावेळी बांगलादेशने 17 षटकांत 6 बाद 107 धावा केल्या होत्या. यानंतर उरलेल्या षटकांमध्ये बांगलादेशचे फलंदाज काही खास कामगिरी करू शकले नाही. 19 व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर तस्कीन अहमद (1) आणि त्यानंतर 19.5 व्या षटकात नसुम अहमद बाद (7) झाले. अफिफ हुसेन 20 चेंडूत 24 धावा करून नाबाद राहिला. याचबरोबर ते 20 षटकांत 8 गडी गमावून 127 धावांपर्यंतच मजल मारू शकले.
पाकिस्तान आणि बांगलादेश या दोन्ही संघांचे प्रत्येकी चार गुण आहेत आणि विजयामुळे त्यांचे सहा गुण होतील. अव्वल क्रमांकावर असलेल्या भारताचे आधीच सहा गुण आहेत. आज झिम्बाब्वेविरुद्ध टीम इंडियाला खेळायचे आहे.
मोहम्मद रिझवान, बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद हरिस, शान मसूद, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, मोहम्मद वसीम जूनियर, शाहीन आफ्रिदी, हरिस रौफ, नसीम शाह.
नजमुल हुसेन शांतो, लिटन दास, शाकिब अल हसन (कर्णधार), सौम्या सरकार, अफिफ हुसेन, नुरुल हसन, तस्किन अहमद, मोसाद्देक हुसेन, नसुम अहमद, मुस्तफिजुर रहमान, इबादत हुसेन.