Latest

Twitter news: तासभरानंतर जगभरातील सोशल मीडिया ‘एक्स’ पुन्हा कार्यरत

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन डेस्क: मायक्रोब्लॉगिंग साइट 'X' (पूर्वीचे ट्विटर) गुरुवारी (दि.२१) सकाळी 11 च्या सुमारास डाऊन झाले. जवळपास  1 तासाच्या प्रतीक्षेनंतर एक्स पुन्हा कार्यरत झाले आहे. दरम्यान जगभर सोशल मीडिया एक्स डाऊन झाले असल्याने जगभरात लोकांमधील अस्वस्थता वाढली होती. पण आता पुन्हा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स पुन्हा कार्यरत झाले आहे. (Twitter news)

सोशल मीडियावर प्लॅटफॉर्म  एक्स X (पूर्वीचे ट्विटर) आज सकाळी ११ वाजेच्या दरम्यान अचानक डाऊन झाले. एक्सचा सर्व्हर डाऊन झाल्याने  जगभरातील युजर्संमधील अस्वस्थता प्रचंड वाढली. अनेक युजर्संनी 'Downdetector' डाऊनडिटेक्टरवर प्रश्नांचा पाऊस पाडला. दरम्यान १ तासाच्या प्रतीक्षेनंतर सोशल मीडिया 'एक्स' पुन्हा कार्यरत झाले. मात्र ट्विटरमध्ये हा तांत्रिक बिघाड अचानक का झाला, या संदर्भात कंपनीकडून अद्याप कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आले नाही. (Twitter news)

Twitter news: 'X' वर नेमका काय बिघाड झाला होता?

वेबसाईट आणि मोबाईल ऍप्लिकेशनवर X अकाऊंट सुरू केल्यानंतर ट्विट्स ऐवजी (पोस्ट) 'तुमच्या टाइमलाइनवर आपले स्वागत आहे' असे दाखवत आहे. यावरून असे दिसते की, प्लॅटफॉर्मला मोठ्या प्रमाणात आउटेजचा सामना करावा लागत आहे तसेच युजर्ससाठी X चा वापर करणे शक्य होत नसल्याचे अनेक युजर्संनी डाऊनडिटेक्टरला दिलेल्या माहितीत स्पष्ट केले आहे. (Twitter news)

SCROLL FOR NEXT