Latest

अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचे X अकाउंट सस्पेंड

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन : राष्ट्रवादीतील बंडानंतर अजित पवार यांच्या गटाला एक धक्का बसला आहे. अजित पवार यांच्या गटाच्या राष्ट्रवादीचे X अकाऊंट (ट्विटर) सस्पेंड करण्यात आले आहे. ट्विटरचे नियम न पाळल्याने अजित पवार गटाचे अकाऊंट सस्पेंड करण्यात आले आहे. दरम्यान, शरद पवार यांच्या गटाच्या राष्ट्रवादीचे X अकाऊंट ॲक्टिव्ह आहे. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर शरद पवार आणि अजित पवार यांच्या गटाचे वेगळे अकाउंट पहायला मिळाले होते.

शरद पवार यांचा कव्हर पेजवर फोटो असलेले राष्ट्रवादीचे अकाउंट कार्यान्वित आहे. यावर ७ लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. पण अजित पवार यांच्या गटाच्या राष्ट्रवादीचे अकाउंट सस्पेंड करण्यात आले आहे. त्यावर आता कोणतीही पोस्ट दिसत नाही.

दरम्यान, राष्ट्रवादीत फूट पडल्यापासून पक्षात कोणत्या गटाचे किती आमदार आहेत, हे स्पष्ट होत नव्हते. पण हे प्रकरण आता निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांपर्यंत पोहोचले आहे. यातून अजित पवार यांच्या गटाला ४१ आमदारांचा पाठिंबा असून पक्षाचे शरद पवार यांच्या पाठीशी ११ आमदार असल्याचे समोर आले आहे.

 हे ही वाचा :

SCROLL FOR NEXT