Latest

Wrestlers Protest : कुस्ती संघटनेच्या अतिरिक्त सचिव पदावरून विनोद तोमर निलंबीत

Shambhuraj Pachindre

पुढारी ऑनलाईन डेस्क : दिल्लीतील कुस्तीपटूंचा केलेला छळ आणि आरोपानंतर क्रीडा मंत्रालयाने शनिवारी (दि. २१ जानेवारी) कुस्ती संघटनेचे अतिरिक्त सचिव विनोद तोमर यांना निलंबित केले. खेळाडूंच्या सर्वाधिक तक्रारी विनोद तोमर यांच्याबद्दलच होत्या. केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर कुस्तीपटूंनी संप मिटवण्याचा निर्णय घेतला होता. (Wrestlers Protest)

या चर्चेनंतर एका समितीची घोषणा करण्यात आली. ही समिती आपला अहवाल चार आठवड्यांत सादर करेल. यासोबतच जोपर्यंत तपास पूर्ण होत नाही तोपर्यंत कुस्ती संघटनेचे कामही समिती पाहणार आहे. क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितले की, देखरेख समिती चार आठवड्यांत या प्रकरणाचा अहवाल देईल. (Wrestlers Protest)

याप्रकरणी भारतीय कुस्ती महासंघाचे अतिरिक्त सचिव विनोद तोमर यांनी शनिवारी फेडरेशनचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्यावर लावण्यात आलेले आरोप निराधार असल्याचे म्हटले आहे. एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना तोमर म्हणाले की, दिल्लीच्या जंतर-मंतरवर धरणे धरलेल्या कुस्तीपटूंनी अध्यक्षांवर लैंगिक छळ आणि आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप लावले होते. परंतु, त्यांच्या दाव्यांना समर्थन देण्यासाठी कोणतेही पुरावे सादर केलेले नाहीत.

भारतीय कुस्ती महासंघाने दिले उत्तर

या प्रकरणी भारतीय कुस्ती महासंघाने क्रीडा मंत्रालयाला उत्तर दिले होते. या प्रकरणाची नियंत्रण समितीकडून चौकशी होईपर्यंत कुस्ती संघटनेचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग हे पदाच्या जबाबदारीतून माघार घेतील, असे म्हटले होते. विनोद तोमर म्हणाले की, बृजभूषण शरण सिंह यांनी राजीनामा दिलेला नाही. परंतु, तपास होईपर्यंत त्यांनी फेडरेशनच्या दैनंदिन कामकाजापासून लांब आहेत. जेणेकरून तपासात कोणताही अडथळा येणार नाही. फेडरेशनने म्हटले आहे की, विरोध करणारे कुस्तीपटू वैयक्तिक स्वार्थासाठी किंवा कुस्ती महासंघाच्या व्यवस्थापनाची बदनामी करण्यासाठी कोणत्याही अनावश्यक दबावाखाली निषेध करत आहेत. कुस्ती महासंघाचे सध्याचे व्यवस्थापन काढून टाकण्यासाठी या विरोधामध्ये काही वैयक्तिक आणि छुपा अजेंडा आहे.

विशेष म्हणजे, कुस्तीपटू विनेश फोगटने  बुधवारी धक्कादायक खुलासा करताना आरोप केला की, बृजभूषण शरण सिंह अनेक वर्षांपासून महिला कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण करत आहेत, परंतु क्रीडा प्रशासक आणि भाजप खासदाराने हे आरोप फेटाळून लावले.

हेही वाचा;

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT