Latest

Wrestlers Protest : अल्पवयीन कुस्तीपटूंच्या कुटुंबावर दबाव : साक्षी मलिक

Shambhuraj Pachindre

नवी दिल्ली : अखिल भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष खासदार बृजभूषण सिंह यांच्याविरुद्ध पोक्सो कारवाई रद्द करण्याच्या पोलिसांच्या निर्णयाविरुद्ध पुढील कारवाईचा निर्णय लवकरच घेणार असल्याचे ऑलिम्पिक पदक विजेती कुस्तीपटू साक्षी मलिक हिने सांगितले. तसेच तक्रारदार अल्पवयीन मुलीच्या परिवारावर मोठा दबाव असल्याचेही ती म्हणाली. बृजभूषण सिंह यांच्यावर लैगिक शोषणाचा आरोप करण्यात आले असून याविरोधात देशातील कुस्तीपटूंनी जंतर-मंतरवर धरणे दिली होती. (Wrestlers Protest)

याप्रकरणी क्रीडामंत्र्यांनी ठोस कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर कुस्तीपटू कामावर परतले, पण त्यांनी आपली लढाई सुरूच ठेवणार असल्याचे सांगितले. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी दोन कोर्टात बृजभूषण सिंह यांच्याविरोधात हजार पानांचे आरोपपत्र दाखल केले; परंतु त्यातील पोक्सो खालील तक्रारीबाबत पुरावे नसल्याचे सांगितले. याबद्दल बोलताना साक्षी म्हणाली, आम्ही चार्जशीटची कॉपी मिळावी म्हणून आमच्या वकिलांनी अर्ज केला आहे. त्यातील आरोप काय आहेत हे आम्ही पाहू. ठेवण्यात आलेले आरोप योग्य आहेत की नाही. आम्हाला देण्यात आलेला शब्द पाळण्यात आला आहे की नाही, हे पाहूनच आम्ही पुढील निर्णय घेणार आहोत. त्यासाठी आणखी काही काळ वाट पहावी लागली तरी चालेल. (Wrestlers Protest)

हेही वाचा;

SCROLL FOR NEXT