Latest

World Vegan Day: व्हेगन असण्याचे ‘हे’ आहेत फायदे; या आहारातून मिळतात मुबलक पोषकद्रव्ये

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन: आजकाल 'व्हेगन' डाएट करणे हा जणू ट्रेंडच झाला आहे. बॉलीवूडमध्ये या डाएटची खूप क्रेझ आहे. याप्रकारच्या आहारात मांस-मासे, शेलफिश आणि किटक, दुग्धजन्य पदार्थ, अंडी आणि मध यांसारखे प्राणीजन्य पदार्थ खाणे टाळले जाते. हा डाएट (World Vegan Day) करणारे लोक प्राण्यांपासून तयार केलेले, प्राण्यांवर प्रक्रिया केलेली उत्पादने तसेच मनोरंजनासाठी प्राणी वापरणे पूर्णपणे टाळतात. पर्यावरण आणि प्राणी संरक्षणासाठी अशा प्रकारचा आहार घेतला जातो.

वर्ल्ड व्हेगन डे (World Vegan Day) हा दिवस यूके व्हेगन सोसायटीने (https://www.vegansociety.com/go-vegan/why-go-vegan/health)  1 नोव्हेंबर 1994 रोजी सुरू केला होता. हा दिवस व्हेगन सोसायटीच्या ५० व्या वर्धापन दिनानिमित्त सुरू करण्यात आल्याचे म्हटलं जाते. या प्रकारच्या आहारात फक्त शेंगायुक्त वनस्पती, धान्य, बिया, फळे, भाज्या, नट्स आणि सुका मेवा यांचा समावेश केला जातो.

व्हेगन आहारात (World Vegan Day) प्राण्यांच्या उत्पादनांचा समावेश नसला तरी इतर यामध्ये मुबलक पोषक तत्वे असल्याचे 'द व्हेगन सोसायटी'ने दिलेल्या माहितीमध्ये  म्हटले आहे. सुनियोजितपणे केलेला व्हेगन डाएट हा खाण्याच्या योग्य पद्धतींचा अवलंब करते. यामध्ये शरीराला आवश्यक असलेल्या सर्वप्रकारच्या पोषक घटकांचा समावेश असल्याचेही या सोसायटीने दिलेल्या माहितीत नमूद केले आहे. येथील ब्रिटीश डायटेटिक असोसिएशन आणि अमेरिकन ॲकॅडमी ऑफ न्यूट्रीशन अँड डायटेटिक्स या दोन्ही संस्थांनी देखील व्हेगन आहार हा सर्व वयोगटातील व्यक्ती, गरोदर आणि स्तनपान करणाऱ्या मातांसाठी निरोगी राहण्यास मदत करत असल्याचेही म्हटलं आहे.

World Vegan Day: व्हेगन असण्याचे 'हे' आहेत फायदे

व्हेगन पदार्थात टाळण्यात आलेल्या पदार्थांबद्दल सांगताना व्हेगन सोसायटीने दिलेली माहिती खालीलप्रमाणे 

  •  मांस, दूध आणि अंडी यामुळे शरीरात फॅट साठते. जागतिक आरोग्य संघटनेनेही  मांस हे कर्करोगाचे महत्त्वाचे कारण असल्याचे म्‍हटलं आहे.
  • आहारात मीठाचे प्रमाण मर्यादित ठेवत, भरपूर प्रमाणात व्हेगन आहार म्हणजेच धान्य, फळे, नट्स, भाज्या आणि शेंगा, चणे, लाल स्प्लिट मसूर खाऊन जास्तीत जास्त फायदा मिळवता येतात.
  • व्‍हेगन आहारात भरपूर प्रमाणात फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे मिळतात.
  • व्‍हेगन आहार हा स्वस्थ आणि निरोगी आरोग्यासाठी फायदेशीर ठरतो.
  • या आहारामुळे शरीरातील चरबी वाढत नाही. त्यामुळे वजन नियंत्रणात ठेवण्यास हा आहार उपयुक्त ठरतो.
  • हा आहार  रक्तदाब, कोलेस्ट्रॉल कमी करण्‍याबरोबरच हृदयविकार टाळण्यासह तसेच टाइप २ चा मधुमेहावर नियंत्रण ठेवते
  • मानवी हाडांच्या संरक्षणासाठी व्हेगन आहार आणि जीवनशैली ही अधिक फायदेशीर ठरते
  • व्हेगन आहारामुळे पचनसंस्था नियमित, निरोगी आणि गतिमान होण्यास मदत होते.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT