पुढारी ऑनलाईन डेस्क : भारताने बांगलादेश विरुद्धची कसोटी मालिका 2-0 अशी जिंकली आहे. या दमदार कामगिरीमुळे टीम इंडियाला World Test Championship च्या अंतिम सामन्यात धडक मारण्याची संधी आहे. या कामगिरीमुळे गुणतालिकेत भारत दुसर्या क्रमांकावर कायम आहे. आता World Test Championship च्या फायनलमध्ये धडक मारण्यासाठी असणार्या समीकरणाविषयी जाणून घेवूया.
भारताने दुसऱ्या कसोटी सामन्यात बांगलादेशचा तीन विकेटने पराभव करत मालिका २-० ने जिंकली. या कामगिरीमुळे भारत २०२२-२३ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर कायम राहिला आहे; पण आता भारताला अंतिम फेरी गाठायची असेल तर ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी मालिका ४-० किंवा ३-० अशी जिंकण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे.
भारताला World Test Championship च्या अंतिम फेरी गाठायची असेल तर ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी मालिका जिंकण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे. तसेच दक्षिण आफ्रिका-ऑस्ट्रेलिया या संघासोबत सुरू असलेल्या कसोटी सामन्याच्या निकालावरही भारताला अवलंबून राहावे लागेल. कारण गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर दक्षिण आफ्रिका तर श्रीलंकेचा संघ चौथ्या क्रमांकावर आहे.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेतमध्ये ऑस्ट्रेलिया पहिल्या क्रमांकावर आहे. कसोटी मालिका जिंकण्याची ऑस्ट्रेलियाची विजयाची टक्केवारी ७६.९२ आहे, तर भारताची विजयाची टक्केवारी ५८.९३ आहे, जी जवळपास ५९ टक्के आहे. तिसऱ्या क्रमांकावर दक्षिण आफ्रिका आहे, ज्याची विजयाची टक्केवारी ५४.५५ आहे.
जागतिक कसोटी चॅम्पियनशिप अंतर्गत भारताची पुढील कसोटी मालिका ऑस्ट्रेलियाविरुद्ध आहे, फेब्रुवारी-मार्च 2023 मध्ये भारतात ऑस्ट्रेलिया संघ चार कसोटी सामने खेळणार आहे. आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत आपलं स्थान अबाधित ठेवण्यासाठी टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत दमदार कामगिरी करावी लागणार आहे.
हेही वाचा :