Latest

World laughter Day : हास्य दिनाचे औचित्य साधत आदित्य ठाकरेंचे सूचक ट्विट, “अवकाळी…”

सोनाली जाधव

 पुढारी ऑनलाईन डेस्क : आज जागतिक हास्य दिन. दरवर्षी मे महिन्याच्या पहिल्या रविवारी हा दिवस साजरा केला जातो. याचे औचित्य साधत आमदार आदित्य ठाकरे यांनी 'हास्य आणि 'हास्यास्पद' ह्यातला फरक लक्षात असायला हवा! असं सूचक ट्विट करत त्यांनी राज्‍य सरकारवर निशाणा साधला आहे. आदित्य ठाकरे यांच्या या ट्विटची राजकीय वर्तुळासह सोशल मीडियावर चर्चा होवू लागली आहे. (World laughter Day )

शिवसेनेतील बंडानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपशी युती केली. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. तेव्‍हापासून सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्‍यांच्‍या एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरुच राहिल्‍या आहेत. आज जागतिक हास्य दिन याचे औचित्य साधत आदित्य ठाकरे यांनी सत्ताधारी पक्षावर निशाणा साधला आहे.

World laughter Day : महाराष्ट्रात अवकाळी सरकार

आदित्य ठाकरे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की,आज world laughter day म्हणजेच जागतिक हास्य दिवस! सुखी, निरोगी आणि आनंदी जीवनासाठी हास्य हे अत्यंत गुणकारी औषध आहे! पण हास्य आणि 'हास्यास्पद' ह्यातला फरक लक्षात असायला हवा! आत्ता महाराष्ट्रात अवकाळी सरकारचा जो अनागोंदी कारभार सुरु आहे, तो हास्यास्पद आहे. त्याने जनतेचं आयुष्य आनंदी व सुखकर होण्याऐवजी भयंकरच होताना दिसतंय!

जागतिक हास्य दिन का साजरा केला जातो

मे महिन्याच्या पहिल्या रविवारी जागतिक हास्य दिन साजरा केला जातो. हसण्यामुळे माणसाला अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. सहानुभूतिपूर्ण दुःखाचे प्रतिऔषध, अशी हास्‍याची व्‍याख्‍या ब्रिटिश मानसशास्त्रज्ञ  विल्यम मॅक्डूगल यांनी केली आहे. देश-विदेशात या दिनाच औचित्य साधत कार्यक्रम करत असते. प्रथम हास्य दिन भारतात साजरा केला गेला. १० मे १९९८ रोजी मुंबई येथे डॉ. मदन कटारिया यांनी तो केला होता. हा दिन साजरा करण्यापाठी मागचा उद्देश म्हणजे माणसाच्या आयुष्यातील वाढता ताणतणाव कमी करणे हा आहे.

हसा आणि निराेगी रहा

  • हसल्‍यामुळे नकारात्मकतेची तीव्रता कमी हाेते.  सकारात्मक वाढते. मनात सकारात्मक विचार मनात येतात.
  • अलिकडच्या काही दिवसात ताण-तणाव वाढत असल्याचे दिसतं आहे; पण तुम्हाला माहित आहे का? हसण्याने आलेला ताण-तणाव निघुन जातो.
  • हसण्यामुळे शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढते.
  • ज्यांना ह्रदयाचा त्रास आहे. त्यांनी तर हसायलाच हवे. हसण्याने ह्रदयावरील ताण कमी होताे.
  • जेव्हा तुम्ही हसता तेव्हा शरीरात एंडोर्फिस हा फिल गुड करणार हार्मोन कार्यशील हाेते. त्‍यामुळे अवयव दुखतात ते कमी होतात.
  • वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते. काही संशोधनात आढळून आले आहे की माणूस ताण-तणावात खूप खातो; मग वजन वाढत जाते. जर ताणतणाव नियंत्रणात ठेवला तर वजनवाढही नियंत्रणातही राहील.
  • हसण्यामुळे शरीरातील ऑक्सिजनचे अभिसरण प्रक्रिया वाढते आणि दूषित हवा काढून टाकते.
  • हसणं तुमचं आजार दूर ठेवण्यास मदत करते.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT