Latest

जागतिक डेंग्यू दिन : नाशिक शहरात आढळला डेंग्यूचा रुग्ण

अंजली राऊत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

पावसाळा सुरू होण्यापूर्वीच शहरात डेंग्यूने शिरकाव केला आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार शहरात ३० अहवालांपैकी २६ जणांची चाचणी निगेटिव्ह आली असून, एक पाॅझिटिव्ह आढळला आहे, तर तीन अहवाल प्रलंबित आहेत. उन्हाळ्यामध्येच शहरात डेंग्यू रुग्ण आढळल्याने आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. येत्या पावसाळ्यात डेंग्यूचा फैलाव अधिक वेगाने होण्याची भीती आहे. दरम्यान, महानगरपालिका आरोग्य व मलेरिया विभागामार्फत मंगळवारी (दि. १६) जागतिक डेंग्यू दिनानिमित्त मनपाच्या सहाही विभागांमध्ये मलेरिया विभागातील कर्मचाऱ्यांनी प्रतिज्ञा घेतली. विविध बाजारपेठ, बसस्थानके इत्यादी ठिकाणी प्रबोधन, जनजागृती करण्यात आली.

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT