Latest

Womens T20 WC Final : दक्षिण आफ्रिकाविरूध्द ऑस्ट्रेलियाचे पारडे जड, दोन्‍ही संघांना नवा विक्रम करण्‍याची संधी

Shambhuraj Pachindre

पुढारी ऑनलाईन डेस्क : ऑस्ट्रेलियाला सहाव्यांदा महिला T20 विश्वचषक जिंकण्याची संधी आहे. ऑस्ट्रेलियाने अंतिम सामना जिंकल्यास दुसऱ्यांदा विजेतेपदाची हॅटट्रिक होईल. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेला प्रथमच विश्वचषक जिंकण्याची संधी आहे. (Womens T20 WC Final)

ICC महिला T20 विश्वचषकाचा अंतिम सामना ऑस्ट्रेलिया आणि यजमान दक्षिण आफ्रिका यांच्यात होत आहे. दोन्ही संघांना आजचा सामना जिंकत विक्रम करण्याची संधी आहे. या स्पर्धेत सर्वाधिक जेतेपदे पटकावणारा ऑस्ट्रेलियन संघ दुसऱ्यांदा विजेतेपदाची हॅट्ट्रिक करू शकतो. तसेच अशी कामगिरी करणारा तो पहिला संघ ठरेल. तर, यजमान दक्षिण आफ्रिकेला महिला विश्वचषकावर आपले नाव कोरण्याची संधी मिळाली आहे. दक्षिण आफ्रिकाला विजेतेपद मिळाल्यास हा चषक मिळवणारा तो तिसरा यजमान संघ ठरेल. यापूर्वी 2009 मध्ये यजमान म्हणून इंग्लंडने विजेतेपद पटकावले होते, तर 2020 मध्ये यजमानपद असताना ऑस्ट्रेलियाने स्पर्धा जिंकली होती. (Womens T20 WC Final)

यंदाच्‍या स्‍पर्धेत दक्षिण आफ्रिकेने उपांत्य फेरीत इंग्लंडला पराभूत करून मोठा उलटफेर केला. बलाढ्य ऑस्ट्रेलियाविरुद्धही अशीच कामगिरी करण्याचा निर्धार करत दक्षिण आफ्रिका संघ मैदानात उतरेल. ऑस्ट्रेलियाला या स्पर्धेतील मजबूत संघ आहे. सहाव्यांदा ट्रॉफी जिंकण्याचे त्यांचे लक्ष्य असेल. दक्षिण आफ्रिकेकडे सलामीची जोडी चांगली आहे. लॉरा वुलफार्ट आणि ताजमिन ब्रिट्स यांच्या रूपातील जोडी यजमानांसाठी चांगली कामगिरी करत आहे. ताजमिनने उपांत्य फेरीत इंग्लंडविरुद्ध चांगली खेळी केली होती.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध संघाला चांगली सुरुवात करून देण्याची जबाबदारी या दोघींच्या खांद्यावर असेल. अष्टपैलू मारिजन कॅप ही संघाचा महत्त्वाची खेळाडू आहे. तिने उपांत्य फेरीत शेवटच्या षटकात चांगल्या धावा ठोकल्या होत्या. दक्षिण आफ्रिकेकडे शबनीम इस्माईल आणि अयाबोंगा खाका यांच्यासारखे उत्कृष्ट वेगवान गोलंदाज आहेत. त्यामुळे संघाची गोलंदाजी प्रभावी आहे.

ऑस्ट्रेलियने साखळी फेरीत यजमान दक्षिण आफ्रिकेचा सहा विकेट्सने पराभव केला होता. ऑस्ट्रेलियन संघ प्रत्येक विभागात खूप मजबूत आहे. त्यांच्याकडे ॲलिसा हिली, कर्णधार मेग लॅनिंग, एलिस पेरी आणि गार्डनरसारखे बलवान खेळाडू आहेत जे कोणत्याही क्षणी खेळ मैदानातील चित्र बदलू शकतात.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT