विराटसोबत सोनाक्षीचा भन्नाट डान्स | पुढारी

विराटसोबत सोनाक्षीचा भन्नाट डान्स

पुढारी ऑनलाईन : भारतीय क्रिकेटर टीम इंडियाचा धडाकेबाज क्रिकेटपटू विराट कोहलीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. यात तो अभिनेत्री सोनाक्षी सिन्हासह डान्स करताना दिसत आहे. या व्हिडीओत विराट आणि सोनाक्षी आर. राजकुमार चित्रपटातील ‘साडी के फॉल सा’ गाण्यावर भन्नाट डान्स करताना दिसत आहेत.

क्रिकेटर रोहित शर्माच्या लग्नाच्या रिसेप्शन सोहळ्यातील हा व्हिडीओ असल्याचे सांगितले जात आहे. या व्हिडीओत विराट सोनाक्षीसह गाण्याच्या हूकस्टेप करताना दिसत आहे. आतापर्यंत या व्हिडीओला ५७ हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. रोहित शर्माने २०१५ मध्ये रितिका सजदेहसह लग्नगाठ बांधली. मुंबईत त्यांचा रिसेप्शन सोहळा झाला होता. रोहितच्या रिसेप्शन सोहळ्याला क्रिकेटसह बॉलीवूडमधील सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.

Back to top button