Latest

MPL 2023 : आजपासून एमपीएलमध्ये महिलांचे प्रदर्शनीय सामने

Shambhuraj Pachindre

पुणे; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र क्रिकेट संघटना (एमसीए) आयोजित श्रीराम कॅपिटल महाराष्ट्र प्रीमियर लीग (एमपीएल) स्पर्धेत रविवार (दि. 25 जून) पासून महिलांच्या तीन प्रदर्शनीय सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे. (MPL 2023)

महिलांचे तीन प्रदर्शनीय सामने एमसीए महिला रेड, एमसीए महिला ब्ल्यू आणि एमसीए महिला यलो अशा तीन संघांत होणार आहेत. सामने दु. 1.30 वाजता होणार आहेत. स्मृती मानधना (ब्ल्यू), देविका वैद्य (रेड) आणि तेजल हसबनीस (यलो) यांच्याकडे संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे. भारताची उपकर्णधार स्मृती मानधना या सामन्यांचे प्रमुख आकर्षण आहे. त्याचबरोबर देविका वैद्य, किरण नवगिरे, अनुजा पाटील यांचादेखील सहभाग असणार आहे. या वर्षी एमपीएलच्या प्ले ऑफ लढती दरम्यान महिलांच्या तीन प्रदर्शनीय सामन्यांचे आयोजन केले आहे. महिलांचे तीन प्रदर्शनीय सामने 25, 27, 28 जून रोजी दुपारी 1.30 वजाता एमसीए इंटरनॅशनल स्टेडियम येथे होणार आहेत.

पुढीलप्रमाणे संघ : (कंसात खेळाडूंचा अनुभव)

एमसीए महिला ब्लू : स्मृती मानधना (भारत), माया सोनवणे (इंडिया कॅम्प), शिवाली शिंदे, श्रद्धा पोखरकर (दोन्ही चॅलेंजर मालिका), लक्ष्मी यादव, सायली लोणकर, ऋतुजा देशमुख, साक्षी वाघमोडे, प्रियांका गारखेडे, रसिका शिंदे आणि श्वेता (सर्व महाराष्ट्र). प्रशिक्षिका : चंदाराणी कांबळे; सहायक : वैष्णवी काळे.

एमसीए महिला रेड : देविका वैद्य, अनुजा पाटील, किरण नवगिरे (भारत), श्रावणी देसाई, भक्ती मिरजकर, आदिती गायकवाड, इशिता खळे, प्रियंका घोडके, गौतमी नाईक, श्वेता माने, उत्कर्षा पवार, ईशा पठारे आणि रोहिणी माने (सर्व महाराष्ट्र). प्रशिक्षक : मंदार दळवी; सहायक : सोनिया डबीर.

एमसीए महिला यलो : तेजल हसबनीस, ईश्वरी सावकर (दोन्ही भारत 'अ'), आरती केदार (इंडिया कॅम्प), अंबिका वाटाडे, पूनम खेमनार, मुक्ता मगरे, साक्षी पाटील, सुहानी कहांडळ, माधुरी आघाव, समृद्धी बनवणे आणि चिन्मयी बोरफळे (सर्व महाराष्ट्र). प्रशिक्षिका : भावना गवळी; सहायक : सोनम तांदळे.

हेही वाचा;

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT