India vs Nepal Football : नेपाळला हरवून भारत सेमीफायनलमध्ये

India vs Nepal Football : नेपाळला हरवून भारत सेमीफायनलमध्ये
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय फुटबॉल संघाने सॅफ चॅम्पियनशिप स्पर्धेत सलग दुसरा विजय मिळवला आहे. शनिवारी (दि.२४) 'अ' गटातील दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने नेपाळचा २-० अशा गोल फरकाने पराभव केला. (India vs Nepal Football)

यापूर्वी भारतीय संघाने सलामीच्या सामन्यात पाकिस्तानचा ४-० अशा गोल फरकाने पराभव केला होता. यासह कुवेत संघ 'अ' गटात अव्वलस्थानी आहे. भारताचा पुढचा सामना कुवेतशी होणार आहे. हा सामना दि. २७ जूनला खेळवण्यात येणार आहे. (India vs Nepal Football)

नेपाळविरूध्दच्या सामन्यात भारताकडून कर्णधार सुनील छेत्री आणि नौरेम महेश सिंग यांनी गोलची नोंद केली. सुनील छेत्रीने ६१व्या मिनिटाला गोल करत संघाचे खाते उघडले. त्याचा या स्पर्धेतील हा चौथा गोल आहे. त्याने पाकिस्तानविरुद्ध तीन गोल केले होते. छेत्रीचा हा ९१वा आंतरराष्ट्रीय गोल आहे. महेशने सामन्याच्या ७०व्या मिनिटाला शानदार गोल करत संघाची आघाडी भक्कम केली.

असा रंगला सामना

बेंगलोर येथील श्री कांतिरवा स्टेडियम येथे झालेल्या सामन्यात नेपाळने भारताला विजयासाठी चांगलेच झुंजवले. या सामन्यात दोन्ही संघ हाफमध्ये एकही गोल करू शकले नाहीत. दुसऱ्या हाफच्या पहिल्या वीस मिनिटात देखील नेपाळने जबरदस्त बचावात्मक खेळ केला. मात्र, सामन्याच्या ६५ वा मिनिटाला भारताचा कर्णधार सुनील छेत्रीने हा बचाव भेदत भारतासाठी पहिला गोल नोंदवला. त्यानंतर पाच मिनिटांनी मनवीर सिंग याने देखील गोल करत भारताची आघाडी वाढवली. उर्वरित वेळेत गोल न झाल्याने सामना भारतीय संघाने आपल्या नावे केला.

हेही वाचा;

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news